शोकमग्न कुटुंबीयांकडे पाहुण्यांनी केली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:18 IST2021-02-20T04:18:18+5:302021-02-20T04:18:18+5:30

दोन आठवड्यांनंतर घटना उघड - शांतीनगर पोलिसांत गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - निधन झालेल्या नातेवाइकांकडे पाहुणे बनून ...

Guests steal from bereaved families | शोकमग्न कुटुंबीयांकडे पाहुण्यांनी केली चोरी

शोकमग्न कुटुंबीयांकडे पाहुण्यांनी केली चोरी

दोन आठवड्यांनंतर घटना उघड - शांतीनगर पोलिसांत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - निधन झालेल्या नातेवाइकांकडे पाहुणे बनून आलेल्या आरोपीने घरातील सव्वातीन लाखांचे दागिने लंपास केले. दोन आठवड्यांनंतर पीडित कुटुंबीयांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर त्यांनी बुधवारी शांतीनगर ठाण्यात तक्रार नोंदवली.

शांतीनगर कॉलनीत जनार्दन बाबूरावजी चाैधरी (वय ६५) राहतात. त्यांच्या पत्नी इंदूबाई यांचे निधन झाल्याने २९ जानेवारीला दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत त्यांच्याकडे मोठ्या संख्येत पाहुणे आले होते. चाैधरी कुटुंबीय शोकमग्न असल्याचे पाहून पाहुण्यांपैकी कुणी चाैधरी यांच्या घरातील कपाट चावीने उघडले आणि आतमधील ३ लाख २० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. घरात चोरी झाल्याची बाब दोन आठवड्यांनंतर चाैधरी कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यांनी काही जणांना याबाबत विचारपूसही केली. मात्र, त्यांनी कानावर हात ठेवले. त्यामुळे जनार्दन चाैधरी यांनी शांतीनगर ठाण्यात बुधवारी तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्या पाहुण्याचा पोलीस शोध घेत आहेत.

----

Web Title: Guests steal from bereaved families