शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

ओसीडब्ल्यूच्या कामावर पालकमंत्री नाराज

By admin | Updated: November 11, 2015 02:27 IST

मागील दोन महिन्यांपूर्वी पाणी पुरवठा करणाऱ्या टॅँकर चालकाने हेमंत बंगाले (वय २० वर्षे) या तरुणाला गंभीररीत्या चिरडले होते.

टँकरचा अपघात : गुन्हा दाखल करण्याचे निर्देश नागपूर : मागील दोन महिन्यांपूर्वी पाणी पुरवठा करणाऱ्या टॅँकर चालकाने हेमंत बंगाले (वय २० वर्षे) या तरुणाला गंभीररीत्या चिरडले होते. मात्र असे असताना या प्रकरणी अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. शिवाय अपघातग्रस्त तरुणाला कोणतीही मदत मिळाली नाही. यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओसीडब्ल्यू आणि महानगरपालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करू न पोलिसांना ताबडतोब गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. यासंबंधी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीला आमदार सुधाकर कोहळे, नगरसेविका स्वाती आखतकर, अजय बोढारे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या अपघातात हेमंतच्या पोटावरू न टॅँकरचे चाक गेले होते. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला असून, आजही गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी झालेल्या बैठकीला हेमंतची आई सुद्धा उपस्थित होती. यावेळी ती म्हणाली, मागील दोन महिन्यांपासून ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी त्यांना खूप हेलपाटे घ्यायला लावले. आधी मदत देतो म्हणून सांगितले, परंतु नंतर ती मदत देण्यास नकार दिला. असेही त्यांनी सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी संबंधित पोलिसांना या प्रकरणी ताबडतोब गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच अशा पद्घतीने काम सुरू राहणार असेल, तर खपवून घेतले जाणार नाही. असा इशाराही दिला. त्वरित दवाखान्याचे बिल द्या आणि तासाभरात पुन्हा टॅँकरने पाणी पुरवठा सुरू करण्याचे आदेशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. दुसरीकडे ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी आजच अपघातग्रस्त तरुणाला मदतीचा धनादेश देण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, अपघातानंतर या भागातील नागरिकांनी ओसीडब्ल्यूच्या टँकरचालकाविरूद्ध तक्रारी केल्या होत्या. तसेच गेल्या काही दिवसांपासून नरसाळा गावात आंदोलन सुरू होते. टॅँकरचालक पाणी पुरवठ्यासाठी प्रत्येक महिलेकडे २० रुपयांची मागणी करतात, तसेच पैसे दिले नाही, तर पाणी पुरवठा केला जात नसल्याचे तक्रारीत नमूद केले होते. या संदर्भात मनपाचे कोणतेही नियंत्रण दिसून येत नसल्याने मनपाचे कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांच्यावर पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ओसीडब्ल्यूचे टँकरचालक प्रशिक्षित नाहीत, अशीही यावेळी नागरिकांनी तक्रार केली. (प्रतिनिधी)