सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:08 IST2021-01-04T04:08:12+5:302021-01-04T04:08:12+5:30

कन्हान : येथील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. पाेलीस स्थानकामध्ये आयाेजित कार्यक्रमात सहायक ...

Greetings to Savitribai Phule | सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

कन्हान : येथील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. पाेलीस स्थानकामध्ये आयाेजित कार्यक्रमात सहायक पाेलीस निरीक्षक अमितकुमार आत्राम, कल्पना चाैधरी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. यावेळी नालंदा पाटील, येशू जोसेफ, वीरू चौधरी, शफूल अहमद, सतीश तांदळे, सम्राट वनपती, मनोज जयस्वाल, संजीव भरोडिया, राजेंद्र गौतम, शरद गीते आदी उपस्थित होते. भीम शक्ती संघटना कार्यालयात चंद्रशेखर भिमटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी रमेश गोडघाटे, सलीम सिद्दिकी, निखिल रामटेके, नीलेश पाटील, मनोज शेंडे, रजाक कुरेशी, आर्यन भिमटे, अंबादास खंडारे, मोरेश्वर खडसे, अशोक पाटील, नरेश सोनेकर, कुणाल लोंढे, शरद बेलेकर, भीमराव उके, देविदास खडसे, रामू खडसे, देवेंद्र खडसे आदी उपस्थित होते.

नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष करुणा आष्टनकर यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष योगेश रंगारी, राजेंद्र शेंद्रे, संगीता खोब्रागडे तसेच नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते. कांद्री - कन्हान येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संघमित्रा वंदना संघ, तथागत स्वयंसहायता महिला समूह, भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले होते.

Web Title: Greetings to Savitribai Phule