क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:20 IST2021-01-08T04:20:53+5:302021-01-08T04:20:53+5:30

क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त एलआयसी ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशन, नागपूर डिव्हिजनतर्फे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. विभागाचे मार्केटिंग मॅनेजर ...

Greetings to Krantijyati Savitribai Phule | क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त एलआयसी ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशन, नागपूर डिव्हिजनतर्फे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. विभागाचे मार्केटिंग मॅनेजर नीळकंठ देव व कार्मिक विभाग मॅनेजर देशपांडे यांनी मालार्पण करून अभिवादन केले. यावेळी ओबीसी संघटनेचे जवंजाळकर प्रामुख्याने उपस्थित हाेते. राकेश भूगावकर यांनी संचालन केले. आरती झोटिंग यांनी आभार मानले. ओबीसी संघटनेचे मुकेश अजमिरे, ओंकार मानकर, किशोर चेटुले, भोज हरणे, उमाळे चव्हाण, माधुरी गुरनुले, अर्चना चकोले आदींचा सहभाग हाेता.

शब्दमायाचे प्रकाशन ()

क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुंदेलवार लाईफस्पेसच्या पायल स्वप्निल कुंदेलवार यांच्या संकल्पनेतील शब्दमाया : प्रवास स्त्रीच्या स्त्रीत्वाचा या पुस्तिकेच्या शीर्षकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका रिता काेंगरे, सामाजिक कार्यकर्त्या बेबी गाैरीकर, व्यावसायिका सीमा मेश्राम, डाॅ. काेमल सव्वालाखे, डाॅ. पल्लवी रखटाटे, विजया काेहाट, पूनम वाघ, पीएसआय कीर्ती हरडे यांचा समावेश आहे.

Web Title: Greetings to Krantijyati Savitribai Phule