शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

दादा, भाऊंच्या गडाला हादरा !

By admin | Updated: May 19, 2014 00:44 IST

सोळाव्या लोकसभेचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. त्यात रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांच्यावर भारी पडत शिवसेनेचे कृपाल तुमाने हे १ लाख ७५ हजार ७९१ मतांनी विजयी झाले.

लढाई रामटेकची : कामठीत मारली मुसंडी, रामटेकमध्ये मात्र असमाधानी

 गणेश खवसे - नागपूर

सोळाव्या लोकसभेचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. त्यात रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांच्यावर भारी पडत शिवसेनेचे कृपाल तुमाने हे १ लाख ७५ हजार ७९१ मतांनी विजयी झाले. २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीचा विचार करता तुमाने यांना सरासरी १० टक्के मतांची आघाडी मिळाली. यामध्ये सर्वाधिक मतांची आघाडी ही काटोल विधानसभा क्षेत्रातून ३८,४४६ मतांची मिळाली. सर्वात कमी मतांचा फरक हिंगणा मतदारसंघात १६ हजार ९८३ मतांचा राहिला. सुरुवातीपासून काटोल विधानसभा मतदारसंघाने लोकसभेत शिवसेनेला साथ दिली आहे. मागील २००९ च्या निवडणुकीतही येथे ७ हजार ९५ मतांनी शिवसेना पुढे होती. या मतदारसंघाचे राष्टÑवादीचे अनिल देशमुख हे आमदार असून, त्यांना काँग्रेस-राष्टÑवादीच्या उमेदवाराला आघाडी मिळवून देण्यात गेल्यावेळप्रमाणे यावेळीही यश आले नाही. कामठी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला भरभक्कम ‘लिड’ मिळाली. सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या कामठीतून काँग्रेसला ७१ हजार ८३३ तर, शिवसेनेला १ लाख ७ हजार २५६ मते मिळाली. येथून ३५ हजार ४२३ मतांनी शिवसेना पुढे होती. सावनेर क्षेत्रातून कृपाल तुमाने २९ हजार ९३९ मतांनी तुमाने हे पुढारले. रामटेक विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे आशिष जयस्वाल हे आमदार आहेत. मात्र, पाहिजे तेवढी आघाडी त्यांना शिवसेना उमेदवाराला मिळवून देता आली नाही. सर्वच मतदारसंघात सरासरी १० टक्क्यांची आघाडी असताना या मतदारसंघातून केवळ चार टक्के आघाडी मिळाली. खरेतर रामटेक हा शिवसेनेचा गड आहे. तेथून शिवसेनेला ५० हजारांची आघाडी मिळणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. उमरेड विधानसभा क्षेत्रात शिवसेना उमेदवाराला यावेळी ३१ हजार ४५१ एवढ्या मतांची आघाडी मिळाली. या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात १२ टक्क्यांनी वाढ झाली. ती वाढ शिवसेनेसाठी फायदेशीर ठरली. बसपा, सपाची मते वाढली लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीपेक्षा बहुजन समाज पक्ष तसेच समाजवादी पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये यावेळी मोठी भर पडली. बसपाला ३२८१३ तर सपाला ५६५ मतांचा फायदा यावेळच्या निवडणुकीमध्ये झाला.