पदवीधर मतदारसंघ निवडणूक :  मतदानासाठी १ डिसेंबर रोजी विशेष नैमित्तिक रजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:24 AM2020-11-26T00:24:38+5:302020-11-26T00:26:39+5:30

Graduate Constituency Election, Holiday महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीकरिता १ डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांचे विभागप्रमुख तसेच खासगी औद्योगिक आस्थापनांमधील अधिकारी व कर्मचारी मतदार यांना एक दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रवींद्र खजांजी यांनी कळविले आहे.

Graduate Constituency Election: Special holiday for voting on 1st December | पदवीधर मतदारसंघ निवडणूक :  मतदानासाठी १ डिसेंबर रोजी विशेष नैमित्तिक रजा

पदवीधर मतदारसंघ निवडणूक :  मतदानासाठी १ डिसेंबर रोजी विशेष नैमित्तिक रजा

Next
ठळक मुद्दे८० व १०४ क्रमांकाच्या केंद्रांना सहाय्यकारी मतदान केंद्र म्हणून मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीकरिता १ डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांचे विभागप्रमुख तसेच खासगी औद्योगिक आस्थापनांमधील अधिकारी व कर्मचारी मतदार यांना एक दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रवींद्र खजांजी यांनी कळविले आहे. सदर रजा ही अनुज्ञेय नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे.

त्याचप्रकारे निवडणुकीच्या अनुषंगाने कोविड- १९ संदर्भातील सूचनान्वये मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे सहाय्यकारी मतदान केंद्राचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेता सहाय्यकारी मतदान केंद्र म्हणून मतदार संघातील ८० व १०४ क्रमांकाचे केंद्र प्रस्तावित करण्यात आले होते. या केंद्रांना आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. त्यानुषंगाने नागपूर विभाग पदवीधर मतदान केंद्राच्या यादीत इंग्रजी व मराठीमध्ये दुरुस्ती करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी तथा सहायक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कळविले आहे.

Web Title: Graduate Constituency Election: Special holiday for voting on 1st December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.