शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदा आला रे...

By admin | Updated: August 26, 2016 02:51 IST

इतवारा नवयुवक मंडळातर्फे पुरुष आणि महिला पथकांसाठी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

नागपूर : इतवारा नवयुवक मंडळातर्फे पुरुष आणि महिला पथकांसाठी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आसपासच्या परिसरातून हजारो लोक दहीहंडीच्या उत्साहात सहभागी झाले होते. गोविंदा आला रे..., हर तरफ है ये शोर...,अशा गीतांवर डीजेचे संगीत लोकांचा उत्साह वाढवित होते. यात दहीहंडीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोविंदांवर कार्यकर्त्यांकडून पाण्याचा वर्षाव होत होता.स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महापौर प्रवीण दटके, आ. गिरीश व्यास, विकास कुंभारे, माजी मंत्री अनिस अहमद, माजी खासदार अविनाश पांडे, आभा पांडे, अतुल कोटेचा, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, सतीश हरडे, अतुल लोंढे, राजेश छाबरानी, विनोद इंगोले, रामभाऊ अंबुलकर, कुणाल गडेकर यांच्यासह मंडळाचे संजय खुळे, अभिषेक लुनावत प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटन समारंभ पार पडताच उंच साहसाचा हा उत्साही खेळ सुरू झाला. पोलीस प्रशासनाकडून हंडीच्या आयोजनात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन होणार याबाबत सतर्क होते. तहसिलचे ठाणेदार संतोष खांडे यांनी सांगितले की, इतवारी नवयुवक मंडळाची दहीहंडी ही २० फुट होती. नियमातही हंडी न फुटल्याने उंची कमी करण्यात आली. महिलांमध्ये राधाकृष्ण महिला मंडळाने मारली बाजी स्पर्धेमध्ये महिलांच्या पाच चमू सहभागी झाल्या. यामध्ये रामनगर देहरी क्लब रामपूर दमोह, मध्यप्रदेश, साईबाबा स्पोर्टस् क्लब, सोनेगाव, खामला, जयदुर्गा क्रीडा उत्सव मंडळ, सोनेगाव खामला, राधाकृष्ण महिला मंडळ न्यू सोनेगाव व कासीम कल्याणी मंडळ हिंगणाचा समावेश होता. महिला पथकांसाठी दहीहंडी २० फुटावर ठेवण्यात आली. महिला पथकांनी चारवेळा प्रयत्न केले. हंडी १६ फुटावर आल्यानंतर चौथ्या राऊंडमध्ये पहिल्याच प्रयत्नात न्यू सोनेगावच्या राधाकृष्ण महिला मंडळाच्या चमूने दहीहंडी फोडण्यात यश मिळविले. विजेत्या चमूला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. हंडी फोडण्याचा मान निकिता झोटिंग हिने पटकाविला. पुरुषांमध्ये जय माँ काली मंडळ विजेतेपुरुष गटांमध्ये ११ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये जय भोलेश्वर क्रीडा मंडळ सोनझरी, जय माँ शीतला नृत्य कला मंडळ धम्मदीपनगर, जय माँ काली क्रीडा मंडळ बिडीपेठ, गोल्डन स्पोर्टींग क्लब जुना बगडगंज, राधाकृष्ण मंडळ न्यू सोनेगाव, साईबाबा स्पोर्टस् क्बल, सोनेगाव, जय दुर्गा क्रीडा उत्सव मंडल, सोनेगाव, फ्रेंडस ग्रुप, धामणगाव, जय माँ शीतला भोजपूर, भंडारा, जय शीतला माता ग्रुप, भंडारा व जय श्रीराम क्रीडा मंडळ सहभागी झाले होते. पुरुष गटासाठी दहीहंडीची उंची २० फूट ठेवण्यात आली होती. ही उंची नंतर एक फुट कमी करून १९ फुटावर आणण्यात आली. यावेळी जय माँ काली क्रीडा मंडळ सोनझरीचे गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यात यशस्वी ठरले. विजेता पथकाला २ लाख २२ हजार २२२ रुपयांचे बक्षीस देण्यात आले. दहीहंडी फोडण्याचा मान प्रभाकर रोहणकर या गोविंदाने पटकाविला. (प्रतिनिधी) गोविंदा जखमीदही हंडी फोडण्याचा प्रयत्नात पुरुष व महिला गोविंदा जखमी झाले. एका पथकाच्या सर्वात वरती चढलेल्या गोविंदाने प्रेक्षकांना हात उंचावून अभिवादन केले व तेथूूनच खाली कोलांडउडी घेतली. या प्रयत्नात त्याचा पाठीला व जबडयाला मार बसला. त्याला लगेच तेथे उपलब्ध असलेल्या अ‍ॅम्बुलमध्ये नेऊन उपचार करण्यात आले. तर एका महिला गोविंदाचे पथक तीसऱ्या थरापर्यंत पोहचले असताना मनोरा कोसळला व एका महिला गोविंदाचा पाय मुरगळला.