शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

गोरेवाडा-महाराजबागेतील वन्यप्राण्यांची होणार अदलाबदली ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

नागपूर : स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय उद्यान आणि महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची अदलाबदली करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

नागपूर : स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय उद्यान आणि महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची अदलाबदली करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, गोरेवाडा व्यवस्थापनाने महाराजबाग प्राणिसंग्रहालयातून १० हरिण, ४ काळवीट आणि ४ निलगायींची मागणी केली आहे. तर महाराजबाग व्यवस्थापनाने या बदल्यात गोरेवाडातील एक वाघीण मागितली आहे. याकरिता महाराजबाग व्यवस्थापनाने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. ती मिळताच येथील प्राण्यांची अदलाबदली करता येईल.

महाराजबागेत सध्या ‘जान’ नावाची वाघीण आणि ब्रह्मपुरी येथून आणलेला ‘महाराजा’ हा वाघ आहे. मागील अनेक वर्षांपासून महाराजबाग व्यवस्थापन एक नर वाघ मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्नरत होते. काही वर्षांपूर्वी ‘जान’ वाघिणीची बहीण ‘ली’ हिला गोरेवाडामध्ये प्रजनन कार्यासाठी दिले होते. तर दुसरी बहीण ‘चेरी’ हिला छत्तीसगडमधील काननपेंढरी प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात आले आहे. तेव्हापासून ‘जान’ महाराजबागेत एकटीच आहे. तिच्यासाठी जोडीदार मिळविण्यासाठी येथील व्यवस्थापनाची धडपड सुरू होती. अखेर गोरेवाडा रेस्क्यू सेंटरने ऑगस्ट २०२० मध्ये ब्रम्हपुरीहून पकडून आणलेला ‘महाराजा’ वाघ ब्रीडिंगसाठी दिला. मात्र ‘जान’ आता ११ वर्षांची झाली आहे. अभ्यासकांच्या मते कोणताही वाघ १४ ते १५ वर्षे जगतो. अशा परिस्थितीत आता ५ वर्षांच्या ‘महाराजा’ला एखाद्या वाघिणीची सोबत हवी आहे.

...

बिबट्याच्या हल्ल्यात काळविटाचा झाला होता मृत्यू

प्राप्त माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी गोरेवाडा प्रकल्पामध्येही काळविटाची जोडी होती; परंतु बिबट्याच्या हल्लात एका हरणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गोरेवाडा व्यवस्थापनाने आता पुन्हा काळविटाची मागणी केली आहे.

...