दारू विक्रेत्यांकडून १३ हजाराचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:13 IST2020-12-02T04:13:09+5:302020-12-02T04:13:09+5:30

गोंदिया : तालुक्यातील आसोली येथील विजय वसंत खरोले (३५) हा गावातच दारू गाळण्याचे काम करीत असताना गुन्हे शाखेच्या ...

Goods worth Rs 13,000 seized from liquor dealers | दारू विक्रेत्यांकडून १३ हजाराचा माल जप्त

दारू विक्रेत्यांकडून १३ हजाराचा माल जप्त

गोंदिया : तालुक्यातील आसोली येथील विजय वसंत खरोले (३५) हा गावातच दारू गाळण्याचे काम करीत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड घालून सुरू असलेल्या हातभट्टीतून मोहफुल, दारू गाळण्याचे साहित्य व दारू असा १२ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला.

मोटारसायकल अपघात एक ठार

गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या विहिरगाव बडा ते घुसोबाटोला रोडवर मोटारसायकल हलगर्जीपणे चालवून आंब्याच्या झाडाला धडक दिल्याने चालक मनोज चंद्रहास चुटे (२४) रा. मासळ ता. लाखांदूर जि. भंडारा याचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले. अर्जुनी/मोरगाव पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: Goods worth Rs 13,000 seized from liquor dealers