शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

भिंत अंगावर काेसळून महिलेसह शेळ्या जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:16 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : पावसामुळे मातीसाेबतच लगतची विटांची भिंती काेसळली. त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने वृद्ध महिलेसह चार शेळ्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जलालखेडा : पावसामुळे मातीसाेबतच लगतची विटांची भिंती काेसळली. त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने वृद्ध महिलेसह चार शेळ्या जखमी झाल्या. शिवाय, दाेन्ही घरांतील संसारोपयाेगी साहित्याचे नुकसान झाले. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) येथे साेमवारी (दि. ३०) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

कमलाबाई दशरथ कळंब, रा. जलालखेडा, ता. नरखेड असे जखमी महिलेचे नाव आहे. जलालखेडा येथील वाॅर्ड क्रमांक-३ मध्ये नामदेव बाजीराव कळंबे व रवींद्र दशरथ कळंबे यांची घरे जवळजवळ आहेत. पावसाचे पाणी मुरल्याने साेमवारी सायंकाळी रवींद्र कळंबे यांच्या घराची मातीची भिंत काेसळली. या भिंतीच्या मातीच्या वजनामुळे नामदेव कळंबे यांच्या घराची विटांची भिंतही काेसळली.

या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने कमलाबाई व त्यांच्या घरातील चार शेळ्या जखमी झाल्या. ढिगाऱ्याखाली कमलाबाई दबल्याचे लक्षात येताच नागरिकांनी माती बाजूला करून त्यांना बाहेर काढले व स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचाराला नेले.

जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे, पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, कुलदीप हिवरकर यांनी घरांची पाहणी केली. तलाठी पीयूष गाेमाटे यांनी मंगळवारी सकाळी पंचनामा केला असून, अहवाल तहसीलदारांकडे पाठविला असल्याचे सांगितले. दाेन्ही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

...

अनर्थ टळला

ही दाेन्ही घरे छाेटी आहेत. भिंती काेसळल्या त्यावेळी घरांमधील सदस्य मुख्य खाेलीत नव्हते. या खाेल्यांमध्ये घरांमधील सर्व सदस्य झाेपत असल्याने या भिंती मध्यरात्री काेसळल्या असत्या तर अनर्थ झाला असता. यात दाेन्ही घरांतील टीव्ही, फ्रीज, दिवाण, कपाट, सोफा, धान्य व इतर वस्तू खराब झाल्याने दाेन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दाेघांनीही दिली.