शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

अतिप्रसंगानंतर तरुणीला विकण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 02:16 IST

मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील १९ वर्षीय तरुणीला रामटेक तालुक्यातील खुमारी येथे आणले आणि महिनाभर खोलीत डांबून ठेवले.

खुमारी येथील घटना : महिनाभर खोलीत डांबून ठेवले लोकमत न्यूज नेटवर्क मनसर : मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील १९ वर्षीय तरुणीला रामटेक तालुक्यातील खुमारी येथे आणले आणि महिनाभर खोलीत डांबून ठेवले. एवढेच नव्हे तर तिला साखळीने बांधून तिच्यावर अत्याचारही करण्यात आला. तिला विकण्याचा घाट आरोपीने रचला होता. मात्र, रामटेक पोलिसांनी आरोपीला वेळीच अटक केली. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुमारी येथे नुकतीच घडली. विनोद अमरसिंग जाधव (४०, रा. फुकटनगर, खुमारी, ता. रामटेक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विनोदच्या घरी कुणाला तरी डांबून ठेवले असल्याची कुणकुण स्थानिकांना लागली होती. त्यामुळे यासंदर्भात रामटेक पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी लगेच विनोदच्या घरी धाड टाकून झडती घेतली, तेव्हा सदर तरुणी त्याच्या घरातील खोलीत बंदिस्त असल्याचे तसेच सोफ्याला साखळीने बांधून ठेवले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तिला ताब्यात घेत विचारपूस केली असता, ती काहीही सांगण्याच्या स्थितीत नव्हती. ती मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील रहिवासी असून, तेथील दोघांनी तिला मोटरसायकलने महिनाभरापूर्वी खुमारी येथे आणले आणि विनोदच्या घरी सोडले. तिला तीन-चार दिवसानंतर सोडून देण्याची सूचनाही त्या दोघांनी विनोदला केली होती. मात्र, विनोदने गैरफायदा घेत तिला घरात डांबून ठेवले. एवढेच नव्हे तर तिच्यावर सतत अत्याचारही केला. त्याने सदर तरुणीला विकण्याची योजना आखली होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी तिची सुटका केली. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी भादंवि ३६३, ३४४, ३७६, ३७०, ३०६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार योगेश पारधी करीत आहेत. आरोपीला हद्दपार करा या प्रकरणात विनोद हा एकटा नसून मोठे रॅकेट असल्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. विनोद जाधव हा मानवी तस्करी व देहविक्री व्यवसायात सक्रिय असून, त्याने यापूर्वीही काही महिलांना राज्याबाहेर विकल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच त्याला खुमारी गावातून तसेच परिसरातून हद्दपार करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.