शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या ‘प्रीस्क्रीप्शन’वर जेनेरिक औषधे

By admin | Updated: May 14, 2014 14:19 IST

आजघडीला प्रत्यक्ष आजारापेक्षादेखील त्यावरचा उपचारच जास्त मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटते. या वाढत्या महागाईच्या काळात अनेक नागरिक परवडत नाहीत

 

 

नागपूर : आजघडीला प्रत्यक्ष आजारापेक्षादेखील त्यावरचा उपचारच जास्त मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटते. या वाढत्या महागाईच्या काळात अनेक नागरिक परवडत नाहीत म्हणून औषधे न घेताच रोग आणि आजार सहन करतात. यातच शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांच्या तुटवड्यांमुळे सामान्य रुग्णांचे हाल होत असल्याचे नेहमीचे चित्र आहे. याची दखल घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) प्रशासनाने सोमवार १२ मेपासून

 

सामान्य औषधांच्या तुलनेत जेनेरिक औषधांची किंमत फारच कमी असते. उदाहरणार्थ डॉक्टरांनी सर्दीच्या औषधाचे प्रीस्क्रीप्शन दिले. मेडिकल स्टोअर्समध्ये त्या औषधाची किंमत २0 रु पये असेल, तर जेनेरिक औषधाची किंमत ही ५ रु पये असते. जेनेरिक औषधांची जाहिरात होत नसल्याने आणि कुठल्याही मोठय़ा कंपनीचे नाव सोबत नसल्याने ती स्वस्त असतात. सामान्य आणि जेनेरिक औषध बनवण्याचे सूत्र सारखेच असते. भारत हा जेनेरिक औषधे बनवण्यात आघाडीवर आहे. भारतात तयार केलेली जेनेरिक औषधे आफिक्रा तसेच अनेक देशांमध्ये निर्यात केली जातात.

 

१९७७ मध्ये नेमलेल्या हाथी समितीने फक्त ११७ जेनेरिक औषधे उपलब्ध ठेवा आणि ब्रॅण्डेड औषधे रद्द करा, अशी शिफारस केली होती. ३७ वर्षे झाली, परंतु उपाययोजना नाही. महागडी ब्रॅण्डेड औषधे खरेदी करून ग्राहक औषध उद्योगाच्या घशात प्रचंड पैसा ओतत आहे. देशात २0 हजार कंपन्या सुमारे एक लाख औषधे बनवितात. तीच तीच औषधे निरनिराळ्या नावांनी चढय़ा किमतीत खरेदी केली जातात. जागतिक आरोग्य संघटनेनेही जेनेरिक औषधे प्रचलित ठेवा, अशी शिफारस केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब लोकांना जेनेरिक औषधे मिळणे फार महत्त्वाचे असते. याला घेऊन मेडिकल प्रशासन वारंवार सर्व विभागप्रमुखांना जेनेरिक औषधे देण्याची सूचना देत आले आहे. परंतु याला फारसे गंभीरतेने घेत नसल्याचे दिसून आल्यावर अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्या स्वाक्षरीचे पत्रच सर्व विभागप्रमुखांना दिले आहे. यात रुग्णांना बाहेरून औषधे लिहून देताना जेनेरिक औषधे लिहून द्या, असे बजावले आहे. या पत्रांमुळे विशिष्ट कंपन्यांशी साठगाठ ठेवणार्‍या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे. बहुसंख्य डॉक्टरांनी याचे कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)