शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गौरव एका तपस्वीचा...

By admin | Updated: January 25, 2015 00:52 IST

डॉ. जी.एम. टावरी वेल्लोर सोडून आल्यामुळे वेल्लोरचे नुकसान झाले आणि मध्य भारताचा फायदा झाला. जी.एम. टावरी सरांची जीवनशैली अतिशय साधी असून ते ज्ञानाचा सागर आहेत,

तामिळनाडूतील माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले गुरुऋणनागपूर : डॉ. जी.एम. टावरी वेल्लोर सोडून आल्यामुळे वेल्लोरचे नुकसान झाले आणि मध्य भारताचा फायदा झाला. जी.एम. टावरी सरांची जीवनशैली अतिशय साधी असून ते ज्ञानाचा सागर आहेत, असे विचार टावरी यांच्या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त करून गुरुप्रति आपले ऋण व्यक्त केले. बजाजनगरच्या सीम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. जी.एम. टावरी यांचा तामिळनाडूतील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोरच्या माजी विद्यार्थ्यांनी सत्कार केला. डॉ. टावरींनी वेल्लोरच्या कॉलेजमध्ये न्यूरोलॉजी शिकविलेले विद्यार्थी देश-विदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. समारंभात व्यासपीठावर सीम्सचे उपसंचालक डॉ. लोकेंद्र सिंग, बेंगळुरुच्या साखरा हॉस्पिटलचे प्रोफेसर डॉ. चंद्रण नानामुथु, वॅनलेस हॉस्पिटल मिरजचे संचालक डॉ. नाथानियल सासे, ख्रिश्चन मेडिलकल कॉलेज वेल्लोरचे प्रोफेसर डॉ. मॅथ्यु अलेक्झांडर, सीम्सचे सचिव ओ. पी. जेजानी उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. लोकेंद्र सिंग म्हणाले, सीम्स हॉस्पिटलच्या विकासासाठी डॉ. टावरी सदैव तत्पर राहिले. रिसर्च इन्स्टिट्यूट उभी करण्यात त्यांची भूमिका मोलाची आहे. अनेकांकडून मिळालेल्या दानाच्या रकमेतून सीम्स हॉस्पिटल उभे झाले आहे. डॉ. चंद्रण नानामुथु यांनी डॉ. टावरींची जीवनशैली साधारण असली तरी त्यांच्यात ज्ञानाचा सागर भरलेला असल्याचे सांगितले. डॉ. मॅथ्यु अलेक्झांडर म्हणाले, नागपूरमध्ये स्पेशालिटी इन्स्टिट्यूट तयार करण्यात टावरींची भूमिका महत्त्वाची आहे. डॉ. नाथानियल सासे यांनी हॉस्पिटलसोबत रिसर्च इन्स्टिट्यूट विकसित करण्यात टावरींनी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. सत्काराला उत्तर देताना डॉ. जी.एम. टावरी यांनी व्यवस्थापनाच्या सहकार्यामुळे इन्स्टिट्यूट उभी करू शकल्याचे सांगून सत्काराबद्दल सर्वांचे आभार मानले. संचालन श्रद्धा भुल्लुर यांनी केले. कार्यक्रमाला सीम्स हॉस्पिटलचे व्यवस्थापन प्रतिनिधी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)