शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प

By admin | Updated: November 11, 2015 02:07 IST

ऐन दिवाळीत घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाला आहे.

अधिकाऱ्यांचे एजन्सींशी हितसंबंध : अ.भा. ग्राहक परिषदेचा आरोपनागपूर : ऐन दिवाळीत घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाला आहे. एकीकडे ग्राहकांची ओरड सुरू आहे तर दुसरीकडे पुरवठा अधिकारी नरेश वंजारी हिवाळी अधिवेशनात सिलिंडरचा पुरवठा किती करायचा, यातच व्यस्त आहेत.नागपुरातील धुर्वे गॅस, भेंडे गॅस, ओम गॅस, रश्मी गॅस, विमल गॅस, गावंडे गॅस, डोमेस्टिक गॅस, कोठारी गॅस, कामठी, तिवारी अ‍ॅण्ड कंपनी, कामठी आदी गॅस एजन्सींनी ग्राहकांना घरपोच सेवा देणे जवळपास बंद केले आहे. सिलिंडरचा काळाबाजार सुरू आहे. या एजन्सींवर शासकीय आणि तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा वचक राहिलेला नाही. सणासुदीत सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष असल्याचा आरोप अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे राष्ट्रीय महासचिव देवेंद्र तिवारी यांनी लोकमतशी बोलताना केला.सबसिडी मिळणे बंद?घरगुती सिलिंडर ग्राहकांना सबसिडी मिळणे बंद झाले आहे का, असा सवाल ग्राहक करीत आहेत. सिलिंडरची पूर्ण रक्कम भरूनही ग्राहकाच्या खात्यात सबसिडीची रक्कम जमा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. एजन्सींवर कठोर कारवाई करून अधिकाऱ्यांना घरपोच सिलिंडर उपलब्ध करून देण्याची मागणी तिवारी यांनी केली. कादंबरी भगत यांना निवेदन देतेवळी परिषदेचे पदाधिकारी किशोर गायधने, अनिल लांजेवार, वीणा पौनीकर, सुनीलदत्त पांडे, डी.के. गोळे, वनश्री सिडाम, डॉ. अनिल वाघ, मनोज बोहरा, विकल्पा पौनीकर, विनायक देशमुख, रणजितसिंग ठाकूर, यशवंत इटनकर, उमाशंकर पांडे, राजू पटेल उपस्थित होते.धान्य पुरवठा ठप्पऐन दिवाळीत रेशन दुकानात साखर आणि गहू पोहोचले नाहीत. आयातीत तूर डाळ खरेदीस ग्राहक उत्सुक नाहीत. १०० रुपये किलो विक्रीचे शासनाचे आदेश असतानाही गावरान डाळ १६० ते १८० रुपये किलो विकली जात आहे. महागाईच्या रेट्यात ग्राहक पिचला जात आहे. गरिबांचे काय होणार, हा चर्चेचा विषय आहे. वंजारी यांना निलंबित करागॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्पनागपूर : तिवारी यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने सोमवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी कादंबरी भगत यांची भेट घेऊन नरेश वंजारी यांचे गॅस कंपन्यांशी असलेल्या हितसंबंधावर टीका केली. तिवारी म्हणाले, तीन दिवसांपूर्वी नरेश वंजारी यांची भेट घेऊन ग्राहकांना सिलिंडरचा पुरवठा गोडावूनमधून होत असल्याचे सांगितले होते. पण ते जप्त डाळीचा अहवाल पाठविण्यातच मग्न आहेत. ग्राहकांच्या हिताकडे कानाडोळा करणारे वंजारी यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी तिवारी यांनी भगत यांच्याकडे केली. खापरखेडा येथील कर्मचारी ग्राहक संस्था काळ्या बाजारात सिलिंडरची विक्री करीत आहे तर कामठी येथील कोठारी व तिवारी गॅस एजन्सी पाटणसावंगी येथे रस्त्यावर ट्रक उभा करून ग्राहकांना जास्त दरात सिलिंडर विकत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. (प्रतिनिधी)