शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

उद्यानांचा होणार मेकओव्हर

By admin | Updated: May 24, 2014 01:13 IST

स्वच्छ व सुंदर शहर असा नागपूर शहराचा नावलौकिक आहे. परंतु शहराच्या सौंदर्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या उद्यानांची दुरवस्था आहे. धावपळीच्या जीवनात काही क्षण आनंदात जावे म्हणून

दूरवस्था संपणार : प्रशासन कामाला लागले

नागपूर : स्वच्छ व सुंदर शहर असा नागपूर शहराचा नावलौकिक आहे. परंतु शहराच्या सौंदर्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या उद्यानांची दुरवस्था आहे. धावपळीच्या जीवनात काही क्षण आनंदात जावे म्हणून नागरिक फिरण्यासाठी उद्यानात जातात.परंतु दूरवस्थेमुळे येथे लोकांना बसावेसे वाटत नाही. शहरात महापालिकेची ७९ उद्याने आहेत. बहुसंख्य बगिच्यांची अवस्था बिकट आहे. तुटलेली खेळणी, हिरवळ व वृक्षांचा अभाव आहे. झाडे लावली तरी त्यांचे संगोपन होत नाही. याकडे मनपा प्रशासन व पदाधिकार्‍यांचे लक्ष वेधण्यासाठी ‘लोकमत’ ने यासंदर्भात वृत्त मालिक ा प्रकाशित केली. याची दखल घेत आयुक्त व स्थायी समिती अध्यक्षांनी उद्यान विभागाला निर्देश दिले आहेत. यामुळे प्रशासन कामाला लागले आहे. उद्यानांची दूरवस्था दूर होऊ न लवकरच चांगले दिवस येतील, अशी आशा निर्माण झाली आहे. ‘लोकमत’ चे अभिनंदन शहरातील उद्याने सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी मनपाची आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना आनंद मिळेल अशी व्यवस्था उद्यानात असायला हवी. ‘लोकमत’ ने शहरातील बगिचांच्या दुरवस्थेसंदर्भात वृत्त मालिक ा प्रकाशित केली. मनपा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. ज्या-ज्या उद्यानासंदर्भात माहिती प्रकाशित करण्यात आली. त्या सर्वांचा आढावा घेऊ न कार्यवाही करण्याचे निर्देश उद्यान निरीक्षकांना देण्यात आले आहे. उद्यानातील दुरवस्थेसंदर्भात माहिती प्रकाशित केल्याने ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. यासाठी लोकमत अभिनंदनास पात्र आहे. श्याम वर्धने, आयुक्त, महापालिका उपलब्ध निधी अखर्चित मनपा अर्थसंकल्पात उद्यान विभागासाठी दरवर्षी १० कोटींच्या आसपास तरतूद केली जाते. परंतु यातून विभागाचा आस्थापना खर्च केल्यानंतरही मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित असतो. कर्मचार्‍यांची मोठ्या प्रमाणातील रिक्त पदे व नियोजनाचा अभाव याला कारणीभूत आहे. त्यामुळे निधीअभावी उद्यानाची दुरवस्था नाही तर इच्छाशक्तीचा अभाव असल्याने ही अवस्था झाल्याचे चित्र आहे. अर्थसंकल्पात दोन कोटींची तरतूद करू शहरातील मनपाच्या उद्यानांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी अर्थसंकल्पात दोन कोटीची तरतूद करणार आहे. उद्यानांंचा कायापालट करण्यासाठी स्थायी समिती प्रयत्नशील आहे. नादुरुस्त खेळणी दुरुस्त करण्यासंदर्भातील फाईल उद्यान विभागाकडून मागविण्यात आली आहे. या संदर्भात तातडीने कार्यवाही केली जाईल. आनंद घेण्यासाठी उद्यानात येणार्‍यांचा भ्रमनिराश होणार नाही. यासाठी उद्यानांची देखभाल व दुरुस्ती याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश उद्यान विभागाला दिले आहे. बाल्या बोरकर, स्थायी समिती अध्यक्ष महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष शहरात सिमेंटचे जंगल मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. नागरिकाना मोकळा श्वास घ्यायला, लहान मुलांना खेळायला जागाच शिल्लक राहिलेली नाही. नागरिकांपुढे उद्यानांशिवाय पर्याय नाही. मात्र, शहरातील उद्याने भकास झाली आहेत. बहुतांश उद्यानांमध्ये लहान मुलांची खेळणी तुटलेली आहेत. नागरिकांना बसण्यासाठी लावलेले टेबल तुटले आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. देखभाल केली जात नसल्यामुळे झाडे, हिरवळ सुकली आहे. कमिशनच्या कामांकडे अधिक लक्ष देणार्‍या महापालिकेचे उद्यानांच्या विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. आपण महापालिकेच्या सभेत हा मुद्दा लावून धरू. प्रशासनालाही पत्र देऊ. - विकास ठाकरे, विरोधी पक्षनेते, मनपा कर्मचार्‍यांचा अभाव शहरात महापालिकेची ७९ उद्याने आहेत. हा व्याप विचारात घेता उद्यान विभागात कर्मचार्‍यांची २७३ पदे मंजूर आहेत. परंतु जेमतेम ८८ कर्मचारी कार्यरत आहेत. १८५ पदे रिक्त रिक्त आहेत. याचा परिणाम उद्यानांची देखभाल करण्यावर होतो. असे असले तरी ३-४ बगिचे वगळता तर इतर बगिच्यांची अवस्था चांगली आहे. काही ठिकाणी खेळणी तुटलेली आहे. ती दुरुस्त करण्याचे काम उद्यान विभागाने हाती घेतले आहे. काही उद्यानात लहान मुलांच्या खेळण्यावर मोठी माणसे बसतात. त्यांच्या भारामुळे खेळणी नादुरुस्त होतात. मनपाच्या तुलनेत नासुप्रच्या उद्यानांंची अवस्था बिकट आहे. नरेशचंद्र श्रीखंडे उद्यान निरीक्षक (मनपा) मनपा सभेत प्रश्न मांडणार मनपाच्या उद्यानांची देखभाल होत नाही. पावसाळा आला की, उद्यान विभागाकडून झाडे लावण्याचे आवाहन केले जाते. परंतु लावलेल्या झाडांची देखभाल होत नाही. वित्त विभागाकडूनही उद्यान विभागाची अडवणूक केली जाते. उद्यानांतील खेळण्याची अवस्था बिकट आहे. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. स्थायी समिती सभेत हा प्रश्न उपस्थित करू. शहराला हिरव्या शहराचा मान मिळतो. परंतु सिव्हिल लाईन भागात मनपाचा एकही बगिचा नाही. शहरात जे बगिचे आहेत त्यात चांगले कोणते असा प्रश्न पडतो. प्रगती पाटील गटनेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस