शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गँगवॉर, पवन हिरणवारची हत्या, शेखूने घेतला भावाच्या हत्येचा बदला? : खापरखेडा पाेलिसांत गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:45 IST

ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील बाभूळखेडा-चिचाेली (ता. कामठी) शिवारात गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

नागपूर/खापरखेडा : नागपूर शहरातील पाच गुंड कारने देवदर्शन करून परत येत असताना दुचाकीने आलेल्या दाेन गुंडांनी त्यांना वाटेत अडविले. कारमधील एक गुंड खाली उतरताच दुचाकीवरील दाेघांपैकी एकाने त्यांच्यावर देशीकट्ट्यातून गाेळ्या झाडल्या. यात गँगस्टरचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. गाेळीबार हाेताच कारमधील इतरांनी शेतात पळ काढला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील बाभूळखेडा-चिचाेली (ता. कामठी) शिवारात गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.  पवन धीरज हिरणवार (वय २८, रा. काचीपुरा, नागपूर) असे मृताचे, शैलेश ऊर्फ बंटी हिरणवार (३१) असे जखमीचे नाव आहे. या दाेघांसह हिमांशू गजभिये, साेनू शेंद्रे व सिद्धार्थ काेवे हे पाचजण कारने बाभूळखेडा येथील पंचमुखी हनुमान मंदिरात दर्शनाला गेले हाेते. परतीच्या प्रवासात माेटारसायकलवरून आलेल्या दाेघांनी देशीकट्टा दाखवून त्यांची कार अडवली. 

पवन खाली उतरताच दाेघांपैकी एकाने त्याच्यावर गाेळ्या झाडल्या. दाेन गाेळ्या डाेक्यात व एक छातीत शिरल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बंटीच्या कानाजवळ गाेळी लागल्याने ताे गंभीर जखमी झाला. त्याला नागपुरातील मेयाे हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. गाेळीबार हाेताच कारमधील अन्य तिघे लगतच्या शेतात पळून गेले. पवनच्या मृतदेहाचे पाेस्टमार्टेम मेयाे हाॅस्पिटलमध्ये करण्यात आले. खापरखेडा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

दाेन गँगस्टरमधील वाद टोकालाशेखू खान हा अंबाझरी नागपूर, तर परवेज खान हा माेमीनपुरा नागपूर येथील गँगस्टर आहे. दाेघेही साेबत काम करतात. पवन हा काचीपुरा, नागपूर येथील हिरणवार गँगचा प्रमुख हाेता. शेखू व पवन या दाेघांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. पवन व त्याचा साथीदार परवेश गुप्ता, रा. पांढराबाेडी, नागपूर या दाेघांनी वर्षभरापूर्वी शेखूचा भाऊ सराेज खान याची शंकरनगर नागपूर येथे चाकूने वार करून हत्या केली हाेती. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शेखूने हा हल्ला केल्याची शक्यता पाेलिसांनी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यू