शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कारमध्ये सामूहिक बलात्काराचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 21:46 IST

मैत्रिणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्याच्या प्रयत्नात जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी झालेल्या विलंबाचा लाभ उठवत आरोपींनी त्यात अटकपूर्व जामिन मिळवून आपली मानगुट सोडवून घेण्यात यश मिळवले आहे.

ठळक मुद्देजरीपटक्यात गुन्हा दाखल : आरोपींनी मिळवला अटकपूर्व जामीन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मैत्रिणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्याच्या प्रयत्नात जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी झालेल्या विलंबाचा लाभ उठवत आरोपींनी त्यात अटकपूर्व जामिन मिळवून आपली मानगुट सोडवून घेण्यात यश मिळवले आहे.बल्लू केवलरामानी (वय ५३, रा. कृष्णा अपार्टमेंट, कडबी चौक), ऋषि खोसला (वय ४८, रा. बैरामजी टाउन, सदर) आणि मुन्ना ढोले (वय ५०, रा. राज नगर) अशी या खळबळजनक प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.बल्लू केवलरामानीचे धंतोलीत कॉम्प्युटरचे सिल्वर सिस्टीमच्या नावाने शोरूम असून तो काही राजकीय नेत्यांसोबतही घसट ठेवून आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रार करणा-या ४८ वर्षीय महिलेसोबत त्याचे अनेक दिवसांपासून मधूर संबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बल्लूचे लक्ष दुसरीकडे केंद्रित झाल्यामुळे महिलेसोबत त्याने अंतर राखणे सुरू केले होते.त्यामुळे महिलेने त्याच्यावर पाळत ठेवली होती. व्हॅलेंटाईन डे ला त्याने दुसरीकडेच कार्यक्रम बनविल्याची माहिती कळाल्याने महिलेने त्याला व्हॅलेंटाईन डे च्या कार्यक्रमासंबंधी विचारणा केली. बल्लूने टाळटाळ सुरू केल्याने त्यांच्यात दिवसभर आॅनलाईन वाद रंगला. नंतर बुधवारी रात्री ती १० च्या सुमारास ती त्याच्या घरी धडकली. ते पाहून बल्लू कारमध्ये बसून तिच्याशी चर्चा करू लागला. त्यांच्यातील संवादाने वादाचे रुप घेतले. तेवढ्यात बल्लूने खोसला आणि ढोलेला फोन करून बोलवून घेतले. हे दोघे सरळ कारमध्ये शिरले आणि नंतर तिघांनीही त्या महिलेवर कारमध्येच सामुहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने तीव्र प्रतिकार करून आरडाओरड करीत कसेबसे कारचे दार उघडले आणि सरळ घराकडे पळ काढला. त्यानंतर तिने गुरुवारी जरीपटका पोलिसांकडे तक्रार नोंदवली. विशेष म्हणजे, तीनही आरोपींचे शहरातील अनेक धनिक मंडळीसोबत निकटचे संबंध असल्याने त्यांना वाचविण्यासाठी जरीपटक्यातील काही स्वयंकथित नेते जरीपटका ठाण्यात पोहचले. त्यांनी महिलेचे मन वळवून तिला तक्रार देण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. पोलिसांवरही दडपण वाढवले. यात संपूर्ण दिवस गेला. महिलेने दबाव झुगारून तक्रार नोंदविण्यावर भर दिला. त्यात तेथे काही पत्रकारही पोहचले.त्यामुळे पोलिसांनी अखेर गुरुवारी उशिरारात्री या संबंधात बल्लू केवलरामाणी, ऋषि खोसला तसेच मुन्ना ढोलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल करूनही पोलिसांनी अटकेची तत्परता दाखवली नाही. त्यामुळे आरोपींनी अटकपूर्व जामिन मिळवण्यात यश मिळवले.सीसीटीव्हीकडे लक्ष !महिलेची तक्रार खोटी असल्याचा कांगावा आरोपी आणि त्यांच्या साथीदारांकडून करण्यात आला होता. तो मुद्दा धरून पोलिसांनी घटनास्थळावरच्या सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. मात्र, त्यात बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी ते तज्ज्ञांकडे दिले. हे लॉक झालेले फुटेज २४ तासात उघडले जाईल, असे तज्ज्ञांनी सांगितले होते. त्यानुसार, २४ तास शनिवारी पूर्ण झाले. त्यात काय आहे, ते अद्याप कळू शकले नाही, असे जरीपटक्याचे ठाणेदार पराग पोटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग