शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
5
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
6
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
7
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
8
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
9
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
10
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
11
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
12
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
15
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
16
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
17
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
18
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
19
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
20
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात गजबजली काठोडाची शाळा इतरांसाठी आदर्श

By admin | Updated: May 10, 2014 23:51 IST

जिल्हा परिषद शाळा म्हटले की, विद्यार्थ्यांची दांडी, मुख्यालयी न राहणारे शिक्षक, रोडावलेली पटसंख्या आणि पालकांची उदासीनता असे चित्र डोळ्यापुढे येते.

नि:शुल्क शिबिरात शिक्षक देत आहे विद्यार्थ्यांना धडे

हरिओम बघेल - आर्णी(यवतमाळ)

जिल्हा परिषद शाळा म्हटले की, विद्यार्थ्यांची दांडी, मुख्यालयी न राहणारे शिक्षक, रोडावलेली पटसंख्या आणि पालकांची उदासीनता असे चित्र डोळ्यापुढे येते. इंग्रजी माध्यमाचे फॅड वाढत असताना जिल्हा परिषद शाळेला नाक मुरडले जाते. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील काठोडा येथील जिल्हा परिषद शाळा मात्र त्याला अपवाद आहे. वर्षभर ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षक उन्हाळ्यातही विशेष शिबिर घेऊन विद्यार्थ्यांमध्ये कला कौशल्य शिकविले जात आहे. उन्हाळ्याच्या सुटीतही कोठोडाची शाळा विद्यार्थ्यांनी गजबजून गेली आहे. जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत असल्याचे चित्र सर्वदूर आहे. ग्रामीण भागातही खासगी शाळांचे आक्रमण वाढत आहे. परंतु असे असताना कोठोडाची शाळा मात्र वर्षभर विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आकर्षित करते. जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात ही शाळा असा उपक्रम राबविणारी एकमेव असावी. वर्षभर विद्यार्थ्यांना खेळातून इंग्रजी शिकविले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा केला जातो. प्रत्येक भिंत बोलकी करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालते. विविध उपक्रमात पालकांचाही सहभाग असतो. वर्षभर चालणार्‍या या उपक्रमासोबतच उन्हाळी सुट्यांचाही सदुपयोग ही शाळा करीत आहे. यावर्षी शाळेत उन्हाळी शिबिर आयोजित केले. नि:शुल्क शिबिरात सर्व विद्यार्थी उपस्थित असतात. कुंडी सजावट, वाढदिवस, शुभेच्छापत्र तयार करणे, चित्रकला, मातीपासून विविध वस्तू तयार करणे, अभिनय कौशल्य शिकविले जात आहे. उन्हाळ्याच्या सुट्यातही शिक्षक या विद्यार्थ्यांना मन लावून मार्गदर्शन करताना दिसत आहे. कुणी या शिक्षकांना आदेश दिला नाही की कुणाची जबरदस्ती नाही. केवळ विद्यार्थी प्रेमातून हे शिक्षक हा उपक्रम राबवीत आहे. कधी काळी शिक्षकांबद्दल असलेला दुराग्रहही या उपक्रमामुळे बदलला आहे. शिक्षकांची संवेदनशीलता या विद्यार्थ्यांना आदर्श बनविणार, यात गावकर्‍यांना कोणतीही शंका नाही. आमच्या मुलांवर शिक्षक शिक्षणासोबतच सुसंस्कार करीत असल्याने समाधान वाटते, असे गणेश ढाकूलकर या पालकाने सांगितले. शाळेला नावारुपास आणण्यासाठी मुख्याध्यापिका शारदा काळे, तेजेंद्र चौधरी हे शिक्षक परिश्रम घेत आहेत. संपूर्ण विदर्भात कुठेही उन्हाळ्यात असा उपक्रम सुरू नसेल. मात्र आर्णी तालुक्यातील कोठोडाच्या शाळेने हा उपक्रम सुरू करून इतर शाळांपुढे आदर्शच निर्माण केला आहे.