शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

गाडगेबाबांचे स्मृतिवाहन नागपुरात

By admin | Updated: November 11, 2016 03:07 IST

स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांनी ज्या गाडीतून गावोगावी फिरून स्वच्छतेचा संदेश समाजाला दिला,

राज्यभर स्वच्छतेचा संदेश देणार : ग्रामविकास व जलसंधारण विभागाचा पुढाकार नागपूर : स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांनी ज्या गाडीतून गावोगावी फिरून स्वच्छतेचा संदेश समाजाला दिला, ते गाडगेबाबांचे स्मृतिवाहन शुक्रवारी नागपुरात दाखल होणार आहे. महाराष्ट्र शासनाने गाडगेबाबांच्या स्मृती जपण्यासाठी हे वाहन संग्रही ठेवले असून, २ आॅक्टोबरपासून शासनाने स्वच्छतेचा जागर गावागावात पोहचविण्यासाठी या वाहनाचे पालखीत रूपांतर करून, महाराष्ट्रभर भ्रमंती सुरू केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या वतीने २ आॅक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छतेचा संदेश महाराष्ट्रभर पोहचविण्यासाठी संत गाडगेबाबा यांनी वापरलेल्या गाडीचा उपयोग केला आहे. संत गाडगेबाबा आज नसले तरी, त्यांनी आपल्या कीर्तनातून दिलेला स्वच्छतेचा मूलमंत्र आजही तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. आज त्यांनी वापरलेल्या गाडीचाही महाराष्ट्र सरकार स्वच्छतेचा जागर करण्यासाठी उपयोग करीत आहे. ११ नोव्हेंबर रोजी गाडगेबाबांचे स्मृतिवाहन भंडारामार्गे नागपुरात पोहचणार आहे. प्रथम मौदा पंचायत समिती अंतर्गत महादुला येथे स्वच्छता पालखीचे स्वागत जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. बोरगाव वरून येणारे हे स्मृतिवाहन नागपूर येथे मुक्कामी राहणार आहे. १२ नोव्हेंबरला हिंगणा पंचायत समिती अंतर्गत कवडसमार्गे ग्रामपंचायत पेंढरी देवळी येथे पोहचणार आहे. या दरम्यान गावात लोकसहभागातून स्वच्छता व पारंपरिक पद्धतीने पालखीचे स्वागत, पथनाट्य, गुरुदेव सेवा मंडळाचे व वारकरी मंडळाचे भजन होणार आहे. यात मोठ्या संख्येने ग्रामस्थांचा सहभाग राहणार आहे. नागपूरमार्गे हे स्मृतिवाहन वर्धेकडे रवाना होणार आहे.(प्रतिनिधी)