बेरोजगारी निर्मूलनाचा गडचिरोली पॅटर्न

By Admin | Updated: May 9, 2014 02:15 IST2014-05-09T02:15:50+5:302014-05-09T02:15:50+5:30

नक्षलग्रस्त व मागास जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीने राज्यालाच नव्हे तर देशाला आशेचे किरण दाखविले आहे. ज्या बेरोजगारीच्या संघर्षातून नक्षली घडतात त्या बेरोजगारीला संपविण्यासाठी गडचिरोली

Gadchiroli pattern for unemployment eradication | बेरोजगारी निर्मूलनाचा गडचिरोली पॅटर्न

बेरोजगारी निर्मूलनाचा गडचिरोली पॅटर्न

नक्षलग्रस्त व मागास जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीने राज्यालाच नव्हे तर देशाला आशेचे किरण दाखविले आहे. ज्या बेरोजगारीच्या संघर्षातून नक्षली घडतात त्या बेरोजगारीला संपविण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याने राबविलेल्या पॅटर्नची आता सर्वांनीच दखल घेतली आहे. बेरोजगारी निर्मूलनाचा गडचिरोली पॅटर्न आता होणार आहे. त्यासाठी राज्यातील पाच जिल्ह्याची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली असून, यात नागपूरचाही समावेश आहे.

गडचिरोली जिल्हा उद्योगातही मागास आहे. परंतु या संकटातच समोर जाण्याचा मार्गही गवसला. गडचिरोलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या पुढाकाराने बेरोजगार तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याची योजना आखण्यात आली. बेरोजगार युवकांची नोंदणी करणे, त्यांच्यातील कौशल्याचा शोध घेणे. त्यानुसार त्यांना प्रशिक्षण देणे आणि नोकरीसाठी प्रयत्न करणे, अशी ही योजना होती.
नागपूरसह पाच जिल्ह्याची प्रायोगिक तत्त्वावर निवड
शासनातर्फे राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये बेरोजगार तरुणांसाठी 'स्किल डेव्हलपमेंट' कार्यक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून त्यात नागपूरचाही समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या धर्तीवर हा कार्यक्रम आहे. कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने विभाग तयारीत आहे. परंतु त्यासंबंधीचे दिशानिर्देश मात्र कार्यालयाला अजूनपर्यंत प्राप्त झालेले नाही.- ज्ञा. मा. गोस्वामी, सहायक संचालक

Web Title: Gadchiroli pattern for unemployment eradication