शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

भावी वधूवर बलात्कार

By admin | Updated: May 9, 2015 02:28 IST

लग्न तोडण्याची धमकी देऊन भावी वधूशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीने हुंड्याचे कारण पुढे करून लग्न मोडले.

नागपूर : लग्न तोडण्याची धमकी देऊन भावी वधूशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीने हुंड्याचे कारण पुढे करून लग्न मोडले. कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी योगेश दामोधर देव्हारे (वय ३१) आणि प्रदीप दामोधर देव्हारे (वय ४०) या दोघांवर गुन्हे दाखल केले. आरोपी सावनेर येथील नागमंदिराजवळ राहतात. कोतवालीतील एका तरुणी (वय २८) सोबत योगेशचे लग्न जुळले होते. साक्षगंध झाल्यानंतर आरोपी योगेश वारंवार तिला फिरायला नेऊ लागला. लग्न होणार असल्यामुळे तरुणीसोबत घरच्यांचाही त्याला विरोध नव्हता. १५ फेब्रुवारीला आरोपीने एका ओळखीच्या महिलेच्या घरी तिला नेले. तो तेथे तिच्यासोबत जबरदस्ती करू लागला. तिने नकार देताच त्याने लग्न मोडण्याची धमकी दिली. कुटुंबीयांची प्रतिष्ठा लक्षात घेत तरुणीने त्यावेळी त्याची मागणी मान्य केली. यानंतर योगेश वेळोवेळी नागपुरात येऊन तिला बाहेर नेत होता आणि तिच्याशी शरीरसंबंध जोडत होता. १२ एप्रिलला त्याने असाच प्रकार केला. तरुणीने त्याला विरोध केला असता त्याने आणि त्याचा भाऊ प्रदीप याने तरुणीच्या आईवडीलांकडे हुंड्याखातर ५ लाख रुपये आणि मौल्यवान चिजवस्तूंची मागणी केली. ती पूर्ण करण्यास असमर्थ असल्याचे सांगितल्यामुळे आरोपीने जुळलेले लग्न तुटल्याचे सांगितले. नात्यातील अनेक प्रतिष्ठितांकडून समजूत घालूनही ते ऐकत नसल्याचे पाहून पीडित मुलीने कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी योगेशविरुद्ध बलात्कार तसेच त्याच्यावर आणि त्याच्या भावावर हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)