शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाड्यांमध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंगचा’चा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 10:36 IST

नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज सात ते आठ रेल्वेगाड्या येतात. या रेल्वेगाड्यात बसण्यासाठी बाहेर प्रवाशांच्या रांगा असतात. त्यांच्यात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करण्यात येत नाही.

ठळक मुद्देकसा होणार कोरोनाचा प्रादुर्भाव कमी ?रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

दयानंद पाईकरावनागपूर : देशभरात २०० विशेष रेल्वेगाड्या सुरू करताना रेल्वे बोर्डाने काही नियम लागूू केले होते. परंतु त्या नियमांची नागपूर रेल्वेस्थानकावर पायमल्ली होत असून त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज सात ते आठ रेल्वेगाड्या येतात. या रेल्वेगाड्यात बसण्यासाठी बाहेर प्रवाशांच्या रांगा असतात. त्यांच्यात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करण्यात येत नाही. विशेष रेल्वेगाड्या सुरू करताना रेल्वे बोर्डाने दोन प्रवाशांमध्ये एक मीटरचे अंतर राखण्याचे तसेच त्यांच्या तोंडाला मास्क गरजेचे असावे असा नियम लागू केला होता. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावर या नियमांचा फज्जा उडत असल्याची स्थिती आहे.

नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडीत चढताना एवढी गर्दी होते की दोन प्रवाशांमध्ये एका फूटाचेही अंतर राहत नाही. बुधवारी नागपूर रेल्वेस्थानकाची पाहणी केली असता ही बाब उजेडात आली. नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या आरक्षण कार्यालयात तिकीट काऊंटरवर प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळाली. तिकीट काढताना त्यांच्यात एका फूटाचेही अंतर नव्हते. आरक्षण कार्यालयाच्या परिसरातही प्रवासी एकमेकांच्या जवळ बसले होते. काही प्रवाशांच्या तोंडाला मास्कही नव्हता. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.प्लॅटफॉर्मवरही नियमांकडे दुर्लक्षनागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर टाईल्स बसविण्याचे काम सुरू होते. तेथे चार कामगार काम करीत होते. परंतु तोंडाला मास्क न घालता ते सोबत काम करीत होते. परंतु त्यांना कुणीही हटकताना दिसले नाही.रेल्वे बोर्डाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमांचे पालन प्रवासी करीत नसतील तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे नागपूर विभाग

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे