चितेला अग्नी देताना भडका उडून तीन जण होरपळले; दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2022 01:01 PM2022-07-29T13:01:34+5:302022-07-29T13:25:00+5:30

कामठीच्या राणी तलाव माेक्षधाम येथील घटना

funeral pyre fire flare up, three injured two of them died while treatment | चितेला अग्नी देताना भडका उडून तीन जण होरपळले; दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

चितेला अग्नी देताना भडका उडून तीन जण होरपळले; दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

googlenewsNext

कामठी (नागपूर) : पार्थिव सरणावर ठेवून अग्नी दिल्यानंतर सरणावरील पेटत्या लाकडाचा उडालेला निखारा जवळच असलेल्या डिझेलच्या डबकीवर पडला आणि त्या डिझेलचा भडका उडाला. यात अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांपैकी तिघे भाजल्याने गंभीर जखमी झाले. यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना कामठी शहरातील राणी तलाव माेक्षधाम येथे गुरुवारी (दि. २८) सायंकाळी घडली.

सुधीर डोंगरे (४५), दिलीप गजभिये (६०) अशी मृतकांची नावे आहेत. तर, सुधाकर खोब्रागडे (५०) यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे तिघेही रा. खलासी लाइन, नागसेननगर, कामठीतील रहिवासी आहेत. सिद्धार्थ हुमने, रा. माेदी पाडाव, कामठी यांचे गुरुवारी अपघाती निधन झाल्याने त्यांच्या पार्थिवावर राणी तलाव माेक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत इतरांसह सुधीर डोंगरे, दिलीप गजभिये व सुधाकर खोब्रागडे सहभागी झाले हाेते. सिद्धार्थ हुमने यांचे पार्थिव सरणावर ठेवल्यानंतर त्यांच्या चिंतेला अग्नी देण्यात आला.

पार्थिव व्यवस्थित जळावे यासाठी काहीजण सरणावर डिझेल फेकत हाेते. त्यातच पेटत्या लाकडाचा निखारा उडाला आणि डिझेलच्या डबकीवर पडला. त्यामुळे डबकीतील डिझेलचा भडका उडल्याने डबकीजवळ असलेल्यांनी लगेच पळ काढला. मात्र, सुधीर डोंगरे, दिलीप गजभिये व सुधाकर खोब्रागडे गंभीररीत्या भाजल्या केले. इतरांनी लगेच तिघांच्या अंगावरील कपडे विझवले आणि त्यांना कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले. घटनेची माहिती मिळताच कामठी (नवीन) पाेलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. 

तिघांवर प्रथमाेपचार केल्यानंतर दिलीप गजभिये व सुधाकर खोब्रागडे यांना नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात, तर सुधीर डोंगरे यांना कामठी शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मात्र उपचादारम्यानच यातील दोघांचा मृत्यू झाला.

डिझेल ओतणे अत्यंत घातक

पावसाळ्यात लाकडे जळत नसल्याने ती व्यवस्थित जळावी यासाठी पूर्वी राॅकेलचा वापर केला जायचा. अलीकडे राॅकेल मिळेनासे झाल्याने काही नागरिक डिझेलचा वापर करतात. डिझेल हे राॅकेलच्या तुलनेत अधिक ज्वालाग्राही आहे. अंगावर डिझेल उडून ते जळल्यास शरीर खाेलवर जळत जात असल्याने ते अत्यंत घातक ठरते.

Web Title: funeral pyre fire flare up, three injured two of them died while treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.