शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

जरा हटके! थकल्याभागल्या विद्यार्थ्यांना फळांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:15 IST

नागपूर शहरातील रामनगर चौकात एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांना नि:शुल्क फळांचे वाटप करण्यात येते. यामुळे बच्चेकंपनीलादेखील तरतरी येते अन् त्यानंतर घराकडे त्यांचे पाय झपाट्याने चालायला लागतात.

ठळक मुद्देअनुकरणीय दातृत्व, आरोग्यदायी दानदररोज शाळा सुटल्यावर वाटप

विशाल महाकाळकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळा म्हटली की अभ्यास, वाचन यासोबतच खेळ, धम्माल अन् हल्लागुल्लादेखील आलाच. दिवसभर शाळेत थांबल्यानंतर सायंकाळी घरी जाताना अनेक शाळकरी विद्यार्थी अक्षरश: भुकेने व्याकूळ झाले असतात. आॅटोरिक्षातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे तरी ठीक, परंतु शाळेतून पायी किंवा सायकलने घरी जाणाºया विद्यार्थ्यांचे काय! पोटात कावळे ओरडत असताना नाईलाजाने त्यांना भूक दाबावी लागते अन् अनेकदा ही हताशा त्यांच्या चेहºयावर दिसते. हीच बाब लक्षात घेऊन शहरातील रामनगर चौकात एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांना नि:शुल्क फळांचे वाटप करण्यात येते. यामुळे बच्चेकंपनीलादेखील तरतरी येते अन् त्यानंतर घराकडे त्यांचे पाय झपाट्याने चालायला लागतात.रामनगर चौकात देवीलाल जयस्वाल यांचे निवासस्थान आहे. त्या परिसरात अनेक शाळा आहेत. त्यात नावाजलेल्या शाळांसोबतच मनपा शाळांचादेखील समावेश आहे. आजुबाजूच्या शाळांमध्ये गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात व अनेक जण पायीच घरी जातात. एकदा ८२ वर्षीय जयस्वाल सहज सायंकाळी घरासमोर उभे असताना त्यांना अक्षरश: थकलेल्या अवस्थेत कसेबसे घराकडे जाणारे काही विद्यार्थी दिसले. त्यांनी सहज त्यांना विचारणा केली असता दुपारी दीड वाजता मधल्या सुटीतील जेवणानंतर काहीच खाल्ले नसल्याने भूक लागल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यातूनच जयस्वाल यांना ही कल्पना सुचली.दुपारी मधल्या सुटीत डबा खाल्यानंतर अनेक विद्यार्थी त्यानंतर सायंकाळपर्यंत काहीच खात नाहीत. काही विद्यार्थी तर शाळेत डबादेखील नेत नाही. त्यामुळे दिवसभर शाळेत अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पोटाला पौष्टिक आधार आवश्यक असतो. त्यामुळे त्यांनी घरासमोरच फळवाटपाला सुरुवात केली. यासाठी त्यांनी दोन कर्मचाऱ्यांना जबाबदारी दिली असून ते सायंकाळी पाचच्या सुमारास रामनगर चौकात फळे घेऊन उभे राहतात. येणाºया प्रत्येक विद्यार्थ्याला एक फळ देण्यात येते.थकलेल्या विद्यार्थ्यांत उत्साह संचारतोया उपक्रमाला वर्ष झाले आहे. शाळांतून घरी जाणारे विद्यार्थी स्वत:हून तेथे येतात व तेथील कर्मचारी विनोद पहुरकर व पवन मेश्राम हे त्यांना फळे देतात. अनेक शालेय आॅटोचालकदेखील न चुकता आॅटो तेथे उभा करतात व आॅटोतील विद्यार्थ्यांनादेखील फळ दिले जाते. थकलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहºयावर यानंतर खरोखरच उत्साह संचारल्याचे चित्र दिसून येते.

टॅग्स :Socialसामाजिक