शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅट विक्रीच्या नावावर ३ कोटींनी फसवणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

नागपूर : फ्लॅट स्कीमच्या नावावर बिल्डर जावई आणि मेव्हण्याने ३ कोटींनी फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली असून धंतोली पोलिसांनी ...

नागपूर : फ्लॅट स्कीमच्या नावावर बिल्डर जावई आणि मेव्हण्याने ३ कोटींनी फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली असून धंतोली पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गिरीश मोतीलाल जायसवाल (५८) आणि अजय कृष्णमोहन जायसवाल (५०) अशी आरोपींची नावे आहेत. गिरीश जायस्वाल आणि त्यांचा मेव्हणा अजयने वर्धा मार्गावर साई मंदिराजवळ अष्टविनायक प्लानर्स अँड डेव्हलपर्सच्या नावाने कार्यालय सुरू केले. त्यांनी २०१३ मध्ये गौसी मानापूरमध्ये फार्म सिटीच्या नावाने फ्लॅट स्कीम तयार केली. या स्कीममधील फ्लॅटची नागरिकांना विक्री केली. अंगदसिंह सोलंकीसह १९ नागरिकांनी या स्कीममध्ये फ्लॅटचे बुकिंग केले. त्यांनी २०१३ ते २०१५ दरम्यान ३ कोटी रुपये आरोपींना दिले. आरोपींनी २४ ते ३६ महिन्यात फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. निर्धारीत वेळ झाल्यानंतर सोलंकी आणि इतर गुंतवणूकदारांनी फ्लॅटचा ताबा मागितला. परंतु आरोपी टाळाटाळ करू लागले. फ्लॅटचा ताबा न मिळाल्यामुळे गुंतवणूकदार पैसे परत करण्याचा तगादा लावत होते. आरोपी पैसे परत करण्यासाठी टाळाटाळ करीत होते. गुंतवणूकदारांनी याबाबत तक्रार दाखल केली. तपासानंतर धंतोली पोलिसांनी फसवणूक, बांधकाम, विक्री व्यवस्थापन आणि हस्तांतरण अधिनियम १९६३ नुसार गुन्हा दाखल केला. पीडितांव्यक्तिरिक्त अनेक नागरिकांनी आरोपींकडून फ्लॅट आणि प्लॉट खरेदी केल्याची माहिती आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी पीडित समोर येण्याची शक्यता आहे.

...............