शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
3
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
4
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
5
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
6
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
7
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
8
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
9
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
10
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
11
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
12
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
13
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
14
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
15
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
16
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
17
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
18
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
19
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
20
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात चार कामगार ठार

By admin | Updated: April 30, 2016 02:58 IST

कामगारांना घेऊन जात असलेली भरधाव कार रोडच्या मध्यभागी उभ्या असलेल्या ट्रेलरवर आदळली.

बुटीबोरी एमआयडीसीतील घटना : उभ्या ट्रेलरवर कार आदळलीबुटीबोरी : कामगारांना घेऊन जात असलेली भरधाव कार रोडच्या मध्यभागी उभ्या असलेल्या ट्रेलरवर आदळली. त्यात तिघांचा घटनास्थळीच तर एकाचा उपचारासाठी नेताना वाटेत मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरात गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.अनिल व्यंकटेश बरगट (४६, रा. बुटीबोरी), राकेश रामभोज वर्मा (४०, रा. बुटीबोरी), शुभम विठ्ठलराव भोडवे (२३, रा. माळेगाव, ता. आर्वी, जिल्हा वर्धा) व एस. राजकुमार (२८, रा. चेन्नई, तामिळनाडू) अशी मृत कामगारांची नावे आहेत. हे सर्व कामगार बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील शिल्पा स्टील नामक कंपनीमध्ये कार्यरत असून, बुटीबोरी येथे राहायचे. ते गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे एमएच-३१/सीएस-४१५० क्रमांकाच्या कारने कंपनीत कामावर जाण्यासाठी बुटीबोरीहून एमआयडीसीत जात होते. त्यातच ट्रेलरचालकाने सीजी-०४/जी-६४४४ क्रमांकाचा ट्रेलर रोडच्या मध्यभागी उभा केला आणि कामानिमित्त निघून गेला. त्यावेळी चालकाने सुरक्षेच्या दृष्टीने या ट्रेलरच्या सभोताल कुठलीही उपाययोजना केली नव्हती. दरम्यान, जवळ आल्यावर समोर ट्रेलर उभा असल्याचे कारचालकाच्या निदर्शनास आले. त्याने कारवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला खरा, पण यश आले नाही. परिणामी, भरधाव कार ट्रेलरवर मागच्या बाजूने आदळली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने अनिल, राकेश व कारचालक शुभम या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. त्यांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेत जखमी एस. राजकुमारला उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलविले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासणीअंती मृत घोषित केले. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून ट्रेलरचालकास अटक केली. या घटनेचा तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद बन्सोड करीत आहेत. (प्रतिनिधी)