शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चौघांना जामीन नाकारला

By admin | Updated: January 28, 2015 01:00 IST

कर्लआॅन कंपनीच्या वाडी शाखेत ५३ लाख ६७ हजार ४०७ रुपये किमतीच्या मालाचा घोटाळा केल्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने चार आरोपींचा

न्यायालय : ५३ लाखांचा कर्लआॅन घोटाळानागपूर : कर्लआॅन कंपनीच्या वाडी शाखेत ५३ लाख ६७ हजार ४०७ रुपये किमतीच्या मालाचा घोटाळा केल्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने चार आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. एरिया बिझनेस मॅनेजर अनिरुद्ध घारपुरे, अकाऊंटन्ट अजय जोशी, एरिया बिझनेस आॅफिसर पराग नागपूरकर आणि वेअरहाऊस इन्चार्ज बंडू बुराडे, अशी आरोपींची नावे आहेत. प्रथम खबरी अहवालानुसार या घोटाळ्याची माहिती अशी की, मंगलोर येथे कर्लआॅन एन्टरप्रायजेसचे मुख्यालय आहे. या कंपनीच्या फोम, गाद्या, फर्निचर, पिलो आदी उत्पादनांची संपूर्ण देशात आॅनलाईन पद्धतीने विक्री केली जाते. या आरोपींनी कंपनीच्या मूळ गोदाम व्यतिरिक्त आणखी एक गोदाम भाड्याने घेतले होते. कंपनीकडून आलेला माल मूळ गोदामात न उतरवता स्वत:च्या गोदामात उतरवून ते त्यांची परस्पर विक्री करीत होते. खासगीरीत्या घेतलेल्या गोदामाचे भाडे थकल्याने गोदाम मालकाने कंपनीकडे विचारणा केली असता हा घोटाळा उजेडात आला. कर्लआॅनचे अंधेरी येथील झोनल अकाऊंटन्ट शितल गुछायीत यांनी २०१४ च्या वार्षिक कारभाराची तपासणी केली असता त्यांना हा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अटक टाळण्यासाठी आरोपींनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता तो फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील नितीन देशमुख यांनी काम पाहिले. उपनिरीक्षक शिंदे आणि हेड कॉन्स्टेबल दीपक अवचट तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)