माजी सनदी अधिकारी धनंजय धार्मिक यांचा कॉंग्रेस प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:34 AM2018-07-11T00:34:28+5:302018-07-11T00:35:09+5:30

माजी सनदी अधिकारी व अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय वसंतराव धार्मिक यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

Former IAS officer Dhananjay Dharmik entered in Congress | माजी सनदी अधिकारी धनंजय धार्मिक यांचा कॉंग्रेस प्रवेश

माजी सनदी अधिकारी धनंजय धार्मिक यांचा कॉंग्रेस प्रवेश

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले स्वागत


लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : माजी सनदी अधिकारी व अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय वसंतराव धार्मिक यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
धनंजय धार्मिक मुख्य आयकर आयुक्त म्हणून कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. ते अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सनदी सेवेतील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा काँग्रेस पक्षाला फायदा होईल, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. यावेळी आ. चंद्रकांत रघुवंशी, आ. के. सी. पाडवी, आ. धनाजी अहिरे, उत्तम खोब्रागडे, माजी खासदार सुरेश टावरे, माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव गेडाम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील, रमाकांत म्हात्रे, पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर. सी. घरत, प्रदेश काँग्रेसचे सचिव जिशान अहमद, राजाराम देशमुख उपस्थित होते.

Web Title: Former IAS officer Dhananjay Dharmik entered in Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.