शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

वन अधिकाऱ्यांना खाकीची ‘अ‍ॅलर्जी’

By admin | Updated: September 9, 2016 03:05 IST

वन विभागाची ‘खाकी’ ही शान आहे. अभिमान आहे. एक रुबाब आहे. शिवाय शिस्तीचे प्रतीक आहे.

‘ड्रेस कोड’ गुंडाळला : शिस्त कोलमडलीजीवन रामावत नागपूरवन विभागाची ‘खाकी’ ही शान आहे. अभिमान आहे. एक रुबाब आहे. शिवाय शिस्तीचे प्रतीक आहे. मात्र वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या ‘खाकी’ गणवेशाचीच ‘अ‍ॅलर्जी’ असल्याचे दिसून येत आहे. वन विभागाने पोलिसांच्या धर्तीवर आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी खाकीतील ‘ड्रेस कोड’ तयार केला आहे. तो वनरक्षकापासून तर वनपाल आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसाठी (आरएफओ) अनिवार्य करण्यात आला आहे. जाणकारांच्या मते, गणवेश हा शिस्त शिकवितो आणि कोणतीही फौज म्हटले की, शिस्त ही आलीच. त्यानुसार वन अधिकारी व कर्मचारी ही वन विभागाची फौज आहे. त्यामुळेच या सर्व वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणे अधिकार आणि दर्जा प्रदान करण्यात आला आहे. वन विभागातील वनपालाला (फॉरेस्टर) पोलीस उपनिरीक्षक आणि वन परिक्षेत्र अधिकाऱ्याला पोलीस निरीक्षकाचा दर्जा दिला गेला आहे. शिवाय या दोन्ही अधिकाऱ्यांना आपल्या खाकी वर्दीवर स्टार लावण्याचा मान दिला आहे. मात्र असे असताना वन विभागातील हे अधिकारी व कर्मचारी खाकी गणवेशात का दिसत नाही? असा सर्वत्र प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागपुरात राज्याच्या वन विभागाचे मुख्यालय आहे. येथे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांच्यासह सर्वच वरिष्ठ वन अधिकारी बसतात. तसेच झिरो माईल्स येथे नागपूर वनवृत्ताचे मुख्यालय असून, येथेही मुख्य वनसंरक्षकांसह (सीसीएफ) डझनभर वरिष्ठ अधिकारी बसतात. या उपरोक्त या दोन्ही कार्यालयात कधीच वन अधिकारी वा कर्मचारी गणवेशात दिसत नाही. खरं तर गणवेश हा वन विभागाची ओळख आहे. वरिष्ठांची मूक संमती सध्या वन विभागातील परिस्थिती पाहता वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या मुजोरीला मुख्यालयातील वरिष्ठांची मूक संमती असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच अनेक अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात खुलेआम साध्या गणवेशात वावरताना दिसून येतात. एवढेच नव्हे तर अनेक जण वरिष्ठांसमोर बसून चर्चाही करतात. जाणकारांच्या मते, सर्वप्रथम वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी (आरएफओ) वर्दीकडे पाठ फिरविली आहे. वन विभागातील कोणताही आरएफओ हा एखाद्या समारंभाचा अपवाद वगळता कधीच गणवेशात दिसत नाही. विशेष म्हणजे, हा अधिकारीच गणवेश वापरत नसल्याने त्याच्या अधिकारात काम करणारा वनपाल आणि वनरक्षक सुद्धा गणवेश वापरत नाही. यात आरएफओ साहेबच वर्दीत नसल्याने ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांना सुद्धा काही बोलू शकत नाही. यातून मागील काही वर्षांत वन विभागातील ‘खाकी’ हरवली की काय? असे चित्र दिसू लागले आहे.