‘त्या’ गावात वनविभागाने दिले १२२० गॅस कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:20 IST2021-01-08T04:20:57+5:302021-01-08T04:20:57+5:30

पेंच व्याघ्र प्रकल्पाचे प्रकल्प संचालक रविकिरण गाेवेकर यांनी सादर केलेली माहिती उल्लेखनीय आहे. केंद्राच्या डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी याेजनेंतर्गत ...

The forest department provided 1220 gas connections in that village | ‘त्या’ गावात वनविभागाने दिले १२२० गॅस कनेक्शन

‘त्या’ गावात वनविभागाने दिले १२२० गॅस कनेक्शन

पेंच व्याघ्र प्रकल्पाचे प्रकल्प संचालक रविकिरण गाेवेकर यांनी सादर केलेली माहिती उल्लेखनीय आहे. केंद्राच्या डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी याेजनेंतर्गत गावातील १२२० नागरिकांना गॅस कनेक्शन व रिफीलिंगचा लाभ देण्यात आला. लाॅकडाऊन काळातच १९६ कुटुंबांना याेजनेंतर्गत गॅस कनेक्शनचा लाभ दिला. याशिवाय लाइट, शेगडी खरेदी ४५ लाभार्थी, १३ लाेकांच्या विहिरींना कठडे, ५ नागरिकांना मधमाशा पालन व्यवसायास मदत, २० शेतकऱ्यांना साेलर फेन्सिंग, १९ साेलर लाईट तसेच गावात नाला खाेलीकरणाची ६ कामे, अशी ४५ लाख ८५ हजारांची मदत विविध याेजनांद्वारे करण्यात आली आहे. इडीसी याेजनेंतर्गत ५२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

गावात २४५५ नागरिकांना आराेग्य मदत

वनविभागातर्फे अभयारण्याच्या नजीकच्या २५ गावांसाठी एका एनजीओच्या मदतीने माेबाईल हेल्थ वॅन दाेन वर्षापासून सुरू केली आहे. याद्वारे ऑक्टाेबर २०१८ ते मार्च २०१९ या काळात ७०७२ रुग्ण तर एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या काळात १३०८३ रुग्ण, अशा एकूण २६९८२ रुग्णांना लाभ पाेहचविला. यावर्षी एप्रिल ते डिसेंबर या काळात ६८५२ रुग्णांना लाभ मिळाला. यामध्ये २४५५ रुग्ण एकट्या नवेगाव साधू या गावातील आहेत.

आराेपीचे कुटुंबही लाभार्थी

वाघीण व तिच्या बछड्यांवर विषप्रयाेग करणाऱ्या दिवाकर नागेकर याच्या कुटुंबालाही विविध याेजनांचा लाभ मिळाला आहे. पत्नी सुनंदा नागेकर यांना गॅस कनेक्शन, वडील दत्तू नागेकर यांना स्प्रे पंप तर भावाला साैर कुपणाचा लाभ दिला आहे.

गावकऱ्यांमध्ये विश्वासार्हता वाढविण्यासाठी वनविभागातर्फे सातत्याने समन्वयाचा प्रयत्न केला जात आहे. वन्यप्राण्यांविषयी आपुलकी निर्माण व्हावी यासाठी विविध याेजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पाेहचविला जात आहे. तसेच शेती किंवा जनावरांची हानी झाल्यास त्वरीत नुकसान भरपाई दिली जाते. या प्रयत्नांमुळेच वाघांची संख्या वाढली, हे विसरता येणार नाही.

- रविकिरण गाेवेकर, प्रकल्प संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प

Web Title: The forest department provided 1220 gas connections in that village