शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

शिकवणी वर्गात उपाययाेजनांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST

सुदाम राखडे लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : शहरातील काही भागांत टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर खासगी शिकवणी वर्ग सुरू ...

सुदाम राखडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : शहरातील काही भागांत टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर खासगी शिकवणी वर्ग सुरू झाले आहेत. या शिकवणी वर्गांमध्ये काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन केले जात नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले आहे. सध्या कामठी तालुक्यात काेराेनाचे तीन नवीन रुग्ण आढळून आल्याने शिकवणी वर्ग संचालकांचा हा हलगर्जीपणा धाेकादायक ठरण्याची शक्यता काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.

काेराेनाचे संक्रमण राेखण्यासाठी शासनाने टाळेबंदीची घाेषणा करीत शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्ग बंद ठेवण्याचे आदेश दिले हाेते. दाेन महिन्यांपूर्वी इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतचे वर्ग शासनाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आले आहे. याच काळात कामठी शहरातील मुलींच्या शाळेतील एका शिक्षकाने गोराबाजार, खैरी व इतर ठिकाणी जाऊन शिकवणी वर्ग घ्यायला सुरुवात केली आहे. शहरातील कँटोन्मेंट परिसरात असलेल्या अवंतिका स्कूल ऑफ होम सायन्समधील संगीत विषयाच्या शिक्षकानेही शिकवणी वर्ग घेणे सुरू केल्याची माहिती विद्यार्थ्यांसह पालकांनी दिली.

वास्तवात, टाळेबंदीच्या काळात शासनाने ऑनलाईन शिक्षणाला परवानगी दिल्याने या काळात थाेडेफार का हाेईना विद्यार्थ्यांचे वर्ग घरून सुरू हाेते. इयत्त पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आजही ऑनलाईन सुरू आहेत. मध्यंतरी दीर्घकाळ शाळा बंद असल्याने तसेच शैक्षणिक नुकसान हाेऊ नये म्हणून पालकही त्यांच्या पाल्यांना शिकवणीच्या वर्गात पाठवण्यास पसंती दर्शवितात. परंतु, या शिकवणी वर्गात काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन केले जाते की नाही हे तपासून बघण्याची तसदी पालकांसह नगरपालिका प्रशासन व शिक्षण विभागातील अधिकारी घेत नाहीत.

...

संगीत विषयाची शिकवणी

अवंतिका स्कूल ऑफ होम सायन्समधील शिक्षक शिकवणी वर्ग घेत असून, ते शाळेत संगीत शिकवीत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. ते गणित, विज्ञान व इतर भाषा विषयांची शिकवणी घेत नसून, संगीत विषयाची शिकवणी घेत असल्याचेही काहींनी सांगितले. इतर विषय साेडून संगीत विषयाची शिकवणी घेण्याचे औचित्य काय, हे कळायला मार्ग नाही. शहरातील काही शिक्षक ग्रामीण भागात जाऊन शिकवणी घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

...

शाळा व्यवस्थापनाचा फंडा

पटसंख्या खालावत असल्यामुळे शाळा विकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. यात काही नावाजलेल्या शाळांचाही समावेश आहे. पटसंख्या काम राहावी व शिक्षक अतिरिक्त ठरू नये, यासाठी काही शाळा व्यवस्थापनाने संगीत शिकवणी वर्गाचा नवीन फंडा सुरू केल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. शिकवणी वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घेणे गरजेचे असते. कामठी शहरात नव्याने सुरू करण्यात आलेले शिकवणी वर्ग कुणाच्या परवानगीने सुरू करण्यात आले, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हाेताे.