शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

नागपुरात अन्न पुरवठा विभागाचा घोळ ! गरिबांचा तांदूळ हिसकावून कटिंग, पॉलिश करून माफियांचे मार्केट जोरात

By नरेश डोंगरे | Updated: October 15, 2025 20:03 IST

भ्रष्ट यंत्रणेचे बेमालूम संगणमत : कंची मारलेला तांदूळ पोहचतो बाजारात

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमतने आज 'अन्न पुरवठा विभागातील घोळ बाहेर काढून 'गरिबांच्या हक्काचे अन्न ओरबडतेय भ्रष्ट यंत्रणा' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली. अनेकांनी या संबंधाने प्रत्यक्ष भेटून, फोन करून सरकारी धान्य वितरण प्रणालीला भ्रष्ट यंत्रणेने कशी किड लावली, त्याबाबतचे 'काळे कारनामे' सांगितले. त्यानुसार, गरिबाच्या हक्काच्या रेशनमधून कमी केलेले धान्य, खास करून तांदूळ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने रेशन माफिया कटिंग, पॉलिश करून बाजारात आणतात. ते व्यापाऱ्यांच्या मदतीने दामदुप्पट भावाने विकून त्यातून महिन्याला कोट्यवधी रुपये गिळतात. धक्कादायक म्हणजे, वितरण प्रणालीतील ही भ्रष्ट यंत्रणा सरकारचीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बदनामी करीत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

माहितगार सूत्रांनुसार, एकीकडे गोरगरिबांना वितरित करण्यासाठी आलेला चांगल्या प्रकारचा तांदूळ छू मंतर होतो. त्या बदल्यात अनेक स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचा तांदूळ पोहचतो. हा निकृष्ट तांदुळही अर्थातच 'काळे कारनामे' करणाऱ्यांकडूनच वितरण प्रणालीत घुसविण्यात आलेला असतो. याबाबत दुकानदारांनाही आवाज उचलण्याची मुभा नसते. दरम्यान, खाण्यासारखा नसलेला हा तांदूळ दुकानदारांच्या माध्यमातून वितरित करण्यात आल्याचे कागदोपत्री दाखविले जाते. अशा प्रकारे गोरगरिबांच्या पोटावर झारीतील शुक्राचार्य लाथ मारत असल्याची माहिती आहे.

तांदळाचे 'काळेबेरे, लाखोंचे वारेन्यारे'

शहरात राशन वितरण प्रणाली पोखरून टाकणाऱ्यांपैकी विकी कुंगनी हिवरीवाला, सोनू ठान कामठीवाला, हसनबागचा बबलू आणि जरीपटक्यातील रवी चांदनी हे ते प्रमुख राशन माफिया होय. भ्रष्टाचाऱ्यांचे लाडके असलेल्या या माफियांकडे 'ग्रेन कलेक्शन'ची जबाबदारी आहे. दुकानदारांकडून कंची मारलेले आणि गल्लीबोळात फिरून अल्प किंमतीत विकत घेतलेल्या तांदळाचे 'काळेबेरे' करतात अन् त्यातून रोज लाखोंचे वारेन्यारे करतात.

सरकारचीही होते नाहक बदनामी

निकृष्ट तांदूळ पाहून गोरगरिब जनतेच्या मनात सरकार विषयी भलतीच भावना तयार होते. असे निकृष्ट धान्य पुरवून सरकार आमची थट्टा करीत असल्याची भावना जनतेच्या मनात निर्माण होते. दुसरीकडे हे 'काळेबेरे' करून मध्येच गायब झालेल्या चांगल्या प्रतिच्या तांदळाला 'आपल्या माणसांच्या' गोदामात पोहवले जाते. येथून तो तांदूळ बाजारात येतो आणि त्याची सर्रास दामदुप्पट, तिप्पट भावाने विक्री करून लाखोंचा मलिदा गिळंकृत केला जातो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Food Supply Scam: Poor's Rice Snatched, Mafia Thriving

Web Summary : Nagpur's food supply department faces a scam where subsidized rice meant for the poor is diverted, polished, and sold at inflated prices by a mafia. Corrupt officials facilitate this, causing significant financial loss and damaging the government's reputation. Poor quality rice replaces the good rice.
टॅग्स :nagpurनागपूरFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र