शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सात कोटी नागरिकांना अन्न सुरक्षा

By admin | Updated: August 13, 2015 03:33 IST

राज्यामध्ये सध्याच्या परिस्थितीत सात कोटी नागरिकांना अन्न सुरक्षा प्रदान करण्यात येत आहे

शासनाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : ‘बायोमेट्रिक आॅथेन्टिकेशन’चे समर्थननागपूर : राज्यामध्ये सध्याच्या परिस्थितीत सात कोटी नागरिकांना अन्न सुरक्षा प्रदान करण्यात येत आहे अशी माहिती शासनाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.तिरोडा (गोंदिया) येथील ललिता रंगारी या दलित महिलेच्या भूकबळीची दखल घेऊन शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे उपसचिव सतीश सुपे यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून याचिकेतील आरोप फेटाळून लावले. राज्यात १ फेब्रुवारी २०१२ पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याअंतर्गत राज्यात सात कोटी लाभधारकांचे लक्ष्य पूर्ण करण्यात आले आहे. लाभधारक ठरविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे असून यासंदर्भात १७ डिसेंबर २०१३ रोजी जीआर जारी करण्यात आला आहे. सर्व लाभधारकांना नियमित अन्नधान्य पुरविले जात आहे. ललिता रंगारी व तिच्या मुलाचा नावाचा अंत्योदय रेशनकार्डमध्ये समावेश होता. अंत्योदय कार्डधारकाला दर महिन्याला ३५ किलो धान्य दिले जाते. यामुळे ललिताला धान्य पुरविण्यात आले नसल्याचा आरोप दिशाभूल करणारा आहे असे स्पष्टीकरण प्रतिज्ञापत्रात देण्यात आले आहे.एफसीआय गोदामातून स्वस्त धान्य दुकानांना धान्य पोहोचविण्याची पद्धती १३ जिल्ह्यांत सुरू झाली आहे. अन्य जिल्ह्यातही हीच पद्धत राबविण्यात येईल. ११ मार्च २०१५ रोजी शासनाने स्वस्त धान्य दुकानांमध्ये आधार क्रमांकाच्या आधारे लाभधारकांचे बायोमेट्रिक आॅथेंटिकेशन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. आधार क्रमांक नसलेले लाभधारक धान्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. यामुळे हा निर्णय रद्द करण्याची विनंती संयुक्तिक नाही असे मत शासनाने व्यक्त केले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा तर, शासनातर्फे सरकारी वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)