शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
4
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
5
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
6
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
7
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
10
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
11
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
12
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
13
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
14
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
15
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
16
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
17
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
18
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
19
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
20
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
Daily Top 2Weekly Top 5

चढतोय घसरतोय..

By admin | Updated: January 7, 2015 01:15 IST

गेल्या आठवड्यापासून उपराजधानीचे तापमान अक्षरश: बेभरवशाचे झाले आहे. कधी थंडी, कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण, यामुळे नागरिकदेखील हैराण झाले आहेत. अचानक वर गेलेला

पाऱ्याला नाही थारानागपूर : गेल्या आठवड्यापासून उपराजधानीचे तापमान अक्षरश: बेभरवशाचे झाले आहे. कधी थंडी, कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण, यामुळे नागरिकदेखील हैराण झाले आहेत. अचानक वर गेलेला पारा २४ तासांत अपेक्षेहून कमी तापमानापर्यंत पोहोचत आहे. मंगळवारी नागपुरात ६.६ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे सोमवारी किमान पारा १२.९ अंश सेल्सिअस इतका होता. दर दिवशी वातावरणात चढउतार होत असल्याने हवामानतज्ज्ञ चकित झाले आहेत. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे २०१५ या वर्षातील सुरुवातीचे दोन दिवस पावसात गेले. तत्पूर्वी २९ डिसेंबर रोजी ४५ वर्षांतील सर्वात कमी इतक्या ५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. मध्यंतरी रात्रीचा गारठा थोडा कमी झाला होता व सरासरी १७ अंशांपर्यंत किमान पारा गेला होता. मात्र ढगाळ वातावरण दूर झाल्याने बोचरे वारे वाहण्यास परत सुरुवात झाली आहे. मंगळवारी दिवसभर शहरात बोचरे वारे वाहत होते. सोमवारी किमान १२.९ अंशांवर असणारा किमान पारा मंगळवारी अचानक ६.६ अंशांपर्यंत खाली घसरला. किमान तापमान सरासरीहून ६ अंशांनी कमी होते.मध्यप्रदेश, छत्तीसगड व विदर्भात थंड व कोरडे वारे वाहू लागले आहेत. शिवाय उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत शीतलहर कायम राहील व पारा आणखी घसरू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)