३५ कोटींच्या विम्यासाठी जिनिंगला आग? निष्पाप बालकाच्या मृत्यूनंतर खळबळजनक कागदपत्रे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 17:06 IST2026-02-18T17:01:59+5:302026-02-18T17:06:53+5:30

कुहीतील कल्पना जिनिंगमध्ये अग्नितांडव : निष्पाप बालकाच्या मृत्यूनंतर खळबळजनक कागदपत्रे उघड

Fire in Jining for insurance of Rs 35 crore? Sensational documents revealed after the death of an innocent child | ३५ कोटींच्या विम्यासाठी जिनिंगला आग? निष्पाप बालकाच्या मृत्यूनंतर खळबळजनक कागदपत्रे उघड

Fire in Jining for insurance of Rs 35 crore? Sensational documents revealed after the death of an innocent child

लोकमत न्यूज नेटवर्क
पचखेडी :
कुही तालुक्यातील भंडारबोडी (चिपडी) येथील कल्पना जिनिंगमध्ये १२ फेब्रुवारी रोजी लागलेल्या भीषण आगीने आता एक गंभीर वळण घेतले आहे. या घटनेत रोहन शुरसिंह डुडवे या ४ वर्षीय चिमुरड्याचा होरपळून मृत्यू झाला असतानाच, जिनिंग व्यवस्थापनाचे अनेक बेकायदेशीर कारनामे आणि आर्थिक हितसंबंध उघड झाले आहेत. नऊ वर्षापासून सुरू असलेल्या या जिनिंगचा अकृषक परवाना, हायव्होल्टेज विद्युत तारांचे उल्लंघन आणि आगीच्या अवघ्या सात दिवसांपूर्वी ७/१२ वर नोंद केलेले ३५ कोटींचे कर्ज यामुळे ही आग अपघात नसून सुनियोजित कट असल्याचा संशय बळावला आहे.

जिनिंगच्या छतावरून आणि जिनिंगच्या छतावरून आणि आवारातून हाय व्होल्टेज थ्री-फेज विद्युत वाहिनी गेलेली आहे. नियमानुसार, कापसासारख्या ज्वालाग्रही पदार्थाच्या साठवणुकीवरून विद्युत वाहिनी नेण्यास सक्त मनाई आहे. उघड्या विद्युत तारांमुळेच ही आग लागली असून व्यवस्थापनाने मजुरांच्या कुटुंबाला मृत्यूच्या छायेत ठेवले होते. सात एकर जागेवर ही जिनिंग गेल्या ९ वर्षापासून कार्यरत असताना फक्त पावणेदोन एकर जमिनीचा (भूमापन क्र. १८) औद्योगिक वापरासाठी अकृषक परवाना ७ सप्टेंबर २०१७ साली काढला होता. तर भूमापन क्र. १७ मधील सव्वापाच एकर जागेचा अकृषक परवाना चक्क ११ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात आला आहे. यावरून नऊ वर्षांपासून ही जिनिंग विना-परवाना आणि बेकायदेशीररीत्या सुरू होती, हे स्पष्ट होते. आगीच्या घटनेच्या अवघ्या सात दिवसांपूर्वी, म्हणजेच ५ फेब्रुवारी २०२६ रोजी, व्यवस्थापनाने याच जमिनीवर एचडीएफसी बँकेकडून घेतलेल्या ३५ कोटी रुपयांच्या कर्जाची नोंद ७/१२ वर केली होती. कर्ज घेतल्यावर लागलेली ही आग विमा हडपण्यासाठी लावण्यात आली होती का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

चार वर्षांचा रोहन आगीत

जिनिंगमध्ये कापूस साठवण्याची जागा आणि मजुरांच्या निवासी खोल्या यात कोणतीही सुरक्षा भिंत नव्हती. यामुळेच खेळता-खेळता ४ वर्षाचा रोहन आगीच्या विळख्यात सापडला. धक्कादायक म्हणजे, ३ किमीवर अग्निशमन यंत्रणा असताना २५ किमीवरून उमरेड व मौदा येथून गाडी येईपर्यंत वाट पाहावी लागली.

Web Title : बीमा के लिए जिनिंग मिल में आग? बच्चे की मौत से दस्तावेज़ उजागर।

Web Summary : एक जिनिंग मिल में आग, जिसके परिणामस्वरूप एक बच्चे की मौत हो गई, कथित अवैध गतिविधियों को उजागर करती है। बिना स्वीकृत भूमि उपयोग, उच्च-वोल्टेज तार उल्लंघन, और हाल ही में एक बड़े ऋण ने बीमा धोखाधड़ी के लिए आगजनी का संदेह बढ़ा दिया है। सुरक्षा चूक से दुखद मौत हुई।

Web Title : Ginning Mill Fire for Insurance? Child's Death Unearths Documents.

Web Summary : A fire at a ginning mill, resulting in a child's death, exposes alleged illegal activities. Unapproved land usage, high-voltage wire violations, and a recent large loan raise suspicions of arson for insurance fraud. Safety lapses contributed to the tragic death.