शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये लागणार अग्निशमन उपकरणे

By admin | Updated: June 16, 2014 01:06 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) मागील काही वर्षांत आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. याची दखल घेत मेडिकल प्रशासन १८ ठिकाणी अग्निशमन उपकरणे लावणार आहे.

५० हजारांच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) मागील काही वर्षांत आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. याची दखल घेत मेडिकल प्रशासन १८ ठिकाणी अग्निशमन उपकरणे लावणार आहे. या सोबतच सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना ही उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षणही देणार आहे.
आगीसारखी दुर्घटना घडून रुग्णांचे प्राण संकटात सापडू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ही पावले उचलली आहेत. अधिष्ठात्यांनी उपकरणे खरेदीच्या प्रस्तावाला गुरुवारी मंजुरीही दिली आहे.
विजेचे उपकरण, पेट्रोलियम पदार्थ आणि रसायनांमुळे लागणाऱ्या तिन्ही स्वरूपाच्या आगी विझविण्यासाठी वापरले जाणारे ‘फायर इस्टिंग्युशर सिलिंडर’ कार्यान्वित केले जाणार आहेत. आॅपरेशन थिएटर, पेर्इंग वॉर्ड, एमआर आॅफिस आणि अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात हे उपकरण लवकरच कार्यान्वित केले जाणार आहे.
स्थानिक स्तरावर ५० हजार रु पयांपर्यंतच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी देण्याचा अधिकार अधिष्ठात्यांना असतो. त्यात मेडिकलमध्ये गेल्या आठवड्यात ई-लायब्ररीजवळ आगीची दुर्घटना घडली होती. प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने या आगीत सरकारी मालमत्तेचे नुकसान होता होता वाचले होते. या घटनेला गंभीरतेने घेत वॉर्डांमध्ये अशी घटना घडू नये, यासाठी अधिष्ठात्यांनी या फायर फायटिंग उपकरण खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. प्रगती कॉलनीतील मॉडर्न ट्रेडिंग कॉर्पोरेशन या कंपनीला या फायर फायटिंग उपकरणाचे कंत्राट देण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आॅपरेशन थिएटर परिसरात सहा, पेर्इंग वॉर्डात चार, एमआर आॅफिस परिसरात सहा आणि अधीक्षकांच्या कार्यालयालगतच्या ईएनटी बाह्यरु ग्ण विभागात दोन असे १८ सिलिंडर बसविले जाणार आहेत. (प्रतिनिधी)