शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

टायगर गॅप झोपडपट्टीवासीयांसाठी जागा शोधा

By admin | Updated: March 9, 2016 03:25 IST

टायगर गॅप झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी १५ दिवसात शासकीय जागेचा शोध घेऊन परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश : प्रस्ताव सादर करावानागपूर : टायगर गॅप झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी १५ दिवसात शासकीय जागेचा शोध घेऊन परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या झोपडपट्टीतील आदिवासींना हजारी पहाड येथील म्हाडाच्या जमिनीवर पुनर्वसन करण्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, प्रकाश गजभिये, प्रा. अनिल सोले आणि जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते.१७३ झोपडपट्टीवासी आदिवासींची यादी तयार आहे. ही यादी म्हाडाला दिल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयानुसार टॉयगर गॅपच्या जागेवरून आदिवासींना उठविण्यात आले. तेव्हाच न्यायालयाने शासकीय जागेवर त्यांचे पुनर्वसन करावे असे आदेश दिले होते. पण पुनर्वसन अजून झाले नाही. त्यावेळी हजारी पहाड येथे म्हाडाची जागा आहे. त्या जागेवर पुनर्वसन होऊ शकते, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने म्हटले होते. याकडे आमदार देशमुख यांनी लक्ष वेधले. ही झोपडपट्टी उठवण्यासंदर्भातील आंदोलनात आपण स्वत: सहभागी झालो होतो, असे आमदार प्रकाश गजभिये म्हणाले.म्हाडाच्या घरकुल योजनेत या आदिवासींसाठी १७३ घरकुले राखीव ठेवा, असा पर्यायही बैठकीत आला. पण म्हाडा मोफत घरे देऊ शकत नाही. या घरकुलाची किंमत ७.५० लाख आहे. तसेच आदिवासी गरीब असल्याने ते ही किंमत देऊ शकत नाही त्यामुळे म्हाडाच्या योजनेत हे पुनर्वसन होऊ शकत नाही. यावर पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, १५ दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांनी आमदारांना सोबत घेऊन शासकीय जागेचा शोध घ्यावा व एक पुनर्वसनाचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठवावा. दरम्यान आदिवासींना शासकीय जागांचे पट्टे द्यावे, अशी मागणीही आमदार देशमुख यांनी केली.(प्रतिनिधी)