शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘सेस’वसुली रद्द

By admin | Updated: January 3, 2015 02:26 IST

रस्ते बांधणीवर झालेला खर्च पेट्रोल-डिझेलवर ‘सेस’(कर) आकारून वसूल करण्याचा निर्णय शासनाने अखेर रद्द केल्याने शुक्रवार मध्यरात्रीपासून पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे.

नागपूर : रस्ते बांधणीवर झालेला खर्च पेट्रोल-डिझेलवर ‘सेस’(कर) आकारून वसूल करण्याचा निर्णय शासनाने अखेर रद्द केल्याने शुक्रवार मध्यरात्रीपासून पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागपूरकरांसाठी पेट्रोल प्रति लिटर ५६ पैशांनी तर डिझेल १.५२ पैशांनी स्वस्त झाले आहे. दरवाढीच्या विरोधात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून शासनाचे याकडे लक्ष वेधले होते. त्याचा परिणाम दर कमी होण्यात झाला हे येथे उल्लेखनीय.नागपूरमध्ये महापालिका क्षेत्रात एकात्मिक रस्ते विकास योजनेतून (आयआरडीपी) रस्ते बांधणीसाठी ३५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. हा खर्च वसूल करण्यासाठी २०१२ पासून पेट्रोल-डिझेलवर अनुक्रमे एक व दोन टक्के अतिरिक्त कर आकारला जात होता. त्यामुळे इतर शहराच्या तुलनेत नागपुरातील इंधनाचे दर अधिक राहात होते. कर वसुलीची मुदत ३१ डिसेंबर २०१४ च्या मध्यरात्री संपल्यावर पेट्रोल-डिझेलचे दरही कमी करण्यात आले होते. परंतु लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला कुठलीही अधिसूचना न काढता पुन्हा कर आकारणी सुरू झाली. त्यामुळे दर पु्न्हा जैसे थे झाले. ‘लोकमत’ने यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रकाशित करून दरवाढीच्या माध्यमातून वाहनधारकांवर होणारा अन्याय चव्हाट्यावर आणला होता. वृत्त प्रकाशित होताच सरकार खडबडून जागे झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थमंत्र्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर कर आकारणीचा निर्णय मागे घेऊन नागपूरकरांना दिलासा देण्यात आला. दरम्यान वितरकांनीही आमदार शोभा फडणवीस यांच्या माध्यमातून अर्थमंत्र्यांपर्यत आपले म्हणने पोहोचविले. (प्रतिनिधी)