खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 19:58 IST2025-11-08T19:57:15+5:302025-11-08T19:58:21+5:30
Nagpur : खुर्चीच्या नादात पद गेलं; रोजगार मेळाव्यातील वादामुळे पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

Fight for chair, video goes viral and now suspension! PMG Shobha Madhale suspended indefinitely
नागपूर : काही दिवसांपूर्वी टपाल विभागाने रोजगार मेळा आयोजित केला होता, कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते पण कार्यक्रमादरम्यान निर्माण झालेल्या वादामुळे निलंबनाच्या मार्गावर पोहचलेली पीएमजी शोभा मधाळे यांचे प्रकरण नागपूरमध्ये चर्चेचा विषय झाली आहे. विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, रोजगार मेळाव्याच्या आयोजनामध्ये त्यांच्याकडून चुकीचे वर्तन आढळल्याने दिल्ली येथील मुख्यालयाने कठोर कारवाई केली आहे.
२४ ऑक्टोबर रोजी शहरातील राजनगरमधील नॅशनल फायर सर्व्हिसेस कॉलेजमध्ये जाहीर रोजगार मेळावा झाला होता, ज्याचे आयोजन टपाल विभागाने केले होते. या कार्यक्रमाचा नोडल अधिकारी कार्यालयीन आदेशानुसार प्रभारी पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी यांच्याकडे वाटला होता. मात्र कार्यक्रमादरम्यान बदलीचे ऑर्डर मिळालेले असूनही शोभा मधाळे यांनी त्या ऑर्डरांना विरोध करून उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमादरम्यान मंचावर उपस्थित असताना मधाळे आणि जोशी यांच्यात वाद उत्पन्न झाला. या दरम्यान मधाळे यांनी जोशी यांना हाताच्या कोपऱ्याने धक्का दिला व चिमटा काढल्याचा प्रकार समोर आला. हे सगळे नवीन उमेदवार व अन्य अधिकारी उपस्थित असताना घडले, व त्याचा व्हिडिओही अधिकार्यांपर्यंत पोहोचला त्यानंतर भेदभाव व वर्तनविरुद्धच्या या घडामोडी लक्षात घेता दिल्ली येथील टपाल विभागाने गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी शोभा मधाळे यांना अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे. त्यांचे कार्यालयीन कामकाज थांबविण्यात आले असून, त्यांचे बदलीचे आदेश आधीच आले होते. सुचिता जोशी यांना तात्पुरता प्रभार देण्यात आला आहे.
या घटनेमुळे विभागातील अनुशासन प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, सार्वजनिक सेवेत कार्यरत वरिष्ठ अधिकारी आणि त्यांचे वर्तन, तेव्हा जबाबदारीशी जुळणारे वर्तन महत्त्वाचे ठरते. या वादग्रस्त परिस्थितीनंतर विभागाने पुढील तपास सुरू केला असून, कोणत्या प्रकारची कार्यवाही होईल हे लवकरच समोर येईल.