नितीन राऊत यांच्याविरोधात दिल्लीत फिल्डींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:43 IST2019-09-17T23:42:19+5:302019-09-17T23:43:23+5:30

प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष नितीन राऊत यांच्या संभाव्य उमेदारीविरोधात उत्तर नागपुरातील काँग्रेसची असंतुष्ट मंडळी एकवटली आहे. त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन राऊत यांच्याविरूद्ध फिल्डींग लावली आहे.

Fielding in Delhi against Nitin Raut | नितीन राऊत यांच्याविरोधात दिल्लीत फिल्डींग

नितीन राऊत यांच्याविरोधात दिल्लीत फिल्डींग

लोकमत न्यूजय नेटवर्क
नागपूर : प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष नितीन राऊत यांच्या संभाव्य उमेदारीविरोधात उत्तर नागपुरातील काँग्रेसची असंतुष्ट मंडळी एकवटली आहे. त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन राऊत यांच्याविरूद्ध फिल्डींग लावली आहे.
या गटाने पक्षाचे महासचिव सी. वेणुगोपाल यांची भेट घेऊन उत्तर नागपुरातून नव्या चेहऱ्याला संधी देण्याची मागणी केली.
महानगर पालिकेच्या निवडणुकीत राऊत यांनी काँग्रेस उमेदवारांसाठी काम केले नव्हते. काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात बंडखोर उभे केले. त्यामुळे आता त्यांना तिकीट दिल्यास पक्षातील संभाव्य बंडखोरीची शक्यताही त्यांनी वेणुगोपाल यांच्याकडे वर्तविली. दिल्लीवारीला गेलेल्या नगरसेवकांमध्ये मनोज सांगोळे, संदीप सहारे, स्नेहा निकोसे तसेच भावना लोणारे, धरम पाटील, पंकज लोणारे, किशोर गजभीये, विवेक निकोसे, किशोर दहिवले, सुनीता ढोले,सूरज आंवले, इरशाद मलिक आदींचा समावेश आहे.

Web Title: Fielding in Delhi against Nitin Raut