शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची होणार पीकस्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:09 IST

कळमेश्वर : रबी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी कळमेश्वर तालुका कृषी विभागाच्यावतीने पीकस्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजयी ...

कळमेश्वर : रबी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी कळमेश्वर तालुका कृषी विभागाच्यावतीने पीकस्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजयी शेतकऱ्यांना तालुका, जिल्हा, राज्य व विभागस्तरावर पुरस्कार प्रदान करण्यात येतील अशी माहिती तालुका कृषी अधिकारी उमाकांत हातांगळे यांनी दिली. कृषी विभागाकडून नागपूर जिल्ह्यात रबी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पीक स्पर्धाचे निकष बदलण्यात आले आहे. तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य पिकांच्या जिल्हांतर्गत पीक स्पर्धेचे आधीचे नियम, वेळापत्रक आणि बक्षीस रक्कम देखील बदलण्यात आलेली आहे. यंदाच्या रबी हंगामापासून नव्या निकषाची अंमलबजावणी होईल. त्यासाठी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत शेतकरी अर्ज करू शकतात.

ज्वारी, गहू, हरबरा, जवस, तूर अशा पाच पिकासाठी रबी पीकस्पर्धा होईल. यासाठी शेतकऱ्यांना किमान १० आर क्षेत्रावर सलग लागवड करावी लागेल. पीक स्पर्धेतील पिकाची निवड करताना पिकनिहाय तालुक्यातील क्षेत्र किमान १००० हेक्टर असणे गरजेचे आहे.

तालुका स्तरावर सर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटात ५ कमीत कमी अर्ज येणे आवश्यक आहे. संबंधित गावात त्यासाठी पीक कापणी समिती नेमली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची पीकनिहाय उत्पादकता तालुक्याच्या सर्वसाधारण उत्पादकतेपेक्षा १.५ पट किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना पीकस्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येईल. त्यांच्यामधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात येतील. त्यापेक्षा कमी उत्पादन असणारे शेतकरी सर्व पातळीवरील पीकस्पर्धा पुरस्करासाठी अपात्र समजण्यात येतील.

गावपातळीवर पीक कापणी समिती

पीककापणी समितीत पर्यवेक्षक अधिकारी (अध्यक्ष), कृषी सहायक ( सदस्य सचिव), लाभार्थी शेतकरी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतिशील शेतकरी, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांचा समावेश राहणार आहे.

असे आहेत पुरस्कार

राज्यस्तरावरील स्पर्धेचे निकाल कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती घोषित करेल. जिल्हा स्तरावर पहिला पुरस्कार १० हजार रुपये, दुसरा ७ हजार तर तिसरा पुरस्कार ५ हजार रुपये रोख असा आहे. विभागीय स्तरावर पहिला पुरस्कार २५ हजार, दुसरा २० हजार तर तिसरा पुरस्कार १५ हजार रुपयांचा असेल. तालुका कृषी अधिकाऱ्याकडे संबंधित स्पर्धेसाठी अर्ज करावयाचा आहे. ३०० रुपये स्पर्धा प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल.