शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

इथेही शेतकऱ्याची लुबाडणूक; ग्राहक मागेल त्या भावाला भाजी दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 10:48 IST

महानगरपालिकेने बुधवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात भाजीबाजार भरवून शेतकऱ्यांना तिथे विक्री करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र बहुतेक शेतकऱ्यांनी यापूर्वी अशा पद्धतीने कधीच भाजी विकलेली नाही. परिणामत: त्यांना बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

ठळक मुद्देथेट विक्रीच्या आदेशाचा शेतकऱ्यांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेने बुधवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात भाजीबाजार भरवून शेतकऱ्यांना तिथे विक्री करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र बहुतेक शेतकऱ्यांनी यापूर्वी अशा पद्धतीने कधीच भाजी विकलेली नाही. या संदर्भात त्यांना अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शनही मिळाले नाही. त्यामुळे ग्राहक मागेल त्या भावात भाजी विकून शेतकरी मोकळे झाले. परिणामत: त्यांना बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले.सकाळच्या सुमारास फुले मार्केट, कॉटन मार्केटमधील भाजीबाजार एका तासासाठी सुरू ठेवण्यात आला होता. मात्र त्यानंतर तो बंद करण्यात आला. ताजी भाजी न मिळाल्याने या परिसरातील नागरिक नाराज झाले. दुसरीकडे कळमना बाजार सुरू होता. मात्र ग्राहकच नसल्याने तो बंद करावा लागला. महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रयोग केला असला तरी, तो अयशस्वी ठरला. याचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला. त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बाजारात आणलेली भाजी परत नेऊनही खराबच होणार असल्याने ग्राहक मागतील त्या भावाने अनेक शेतकºयांना विक्री करावी लागली.महात्मा फुले भाजी बाजार अडते (दलाल) असोसिएशनचे सचिव राम महाजन यांच्या मते, शहरातील विविध भागांमध्ये भाजीबाजार सुरू केल्याने जुना बाजार बंद करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. ही व्यवस्था सुरू करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, त्यांच्या मेहनतीचे योग्य दाम मिळावे यासाठी शेतकऱ्यांचीही बाजू ऐकून घ्यायला हवी होती. शहरातील सर्व मुख्य भाजीबाजार, उपबाजारसुद्धा सुरू ठेवले तर नागरिकांना ताजा भाजीपाला योग्य दरात मिळू शकेल. वाढणारी गर्दीही नियंत्रित करता येऊ शकेल. त्यामुळे शहरातील सर्व भाजी बाजार सुरू करावेत, अश्ी मागणी महात्मा फुले भाजी बाजार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना दिवसभर विक्रीची सवय नाहीराम महाजन म्हणाले, शेतकरी शेतातील भाजीपाला दलालांना विकतात, दलाल दिवसभर बसून चिल्लर विक्रेत्यांना विकतात तसेच दिवसभर विक्री करतात. शेतकऱ्यांना ही सवय नाही. त्यांच्याकडे यासाठी वेळही नाही. यामुळेच शेतकऱ्यांना बराच त्रास सहन क रावा लागला.

 

टॅग्स :Farmerशेतकरी