शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वर्‍हाडातील शेतकर्‍यांची हिरवी स्वप्नं करपली

By admin | Updated: August 18, 2014 22:38 IST

पावसाने दडी मारल्याने पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांची स्वप्न करपू लागली असून, तापमानात वाढ झाल्याने पिके कोमेजू लागली आहेत.

अकोला : पावसाने दडी मारल्याने पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांची स्वप्न करपू लागली असून, तापमानात वाढ झाल्याने पिके कोमेजू लागली आहेत. दुबार, तिबार पेरणी करूनही अनेक शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली असून, या संकटाने शेतकरी पार हवालदिल झाले आहेत. पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हयात जवळपास ९२ टक्के म्हणजेच ३0 लाख १३ हजार ७00 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. सर्वाधिक १४ लाख ९0 हजार ६00 हेक्टरवर सोयाबीन तर त्याखालोखाल ९ लाख ३७ हजार ४00 हेक्टरवर कापसाची पेरणी झाली आहे. यावर्षी दीड महिना उशिरा पाऊस सुरू झाल्याने पेरण्यांना विलंब झाला आहे. त्यामुळे अगोदरच पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामध्ये सलग तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली असून, तापमान वाढल्याने पिकं कोमेजू लागली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आता दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. दरम्यान,यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ९४ टक्के क्षेत्रावर शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. अमरावती ९0 टक्के, वाशिम ९४ टक्के, अकोला ८५ व बुलडाणा जिल्ह्यात ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. यावर्षी सोयाबीनचा पेरा घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. सोयाबीनचा पेरा यंदा गतवर्षीपेक्षा कमी असला तरी शेतकर्‍यांनी पहिली पसंती सोयाबीनलाच दिली असून, या पाच जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र जवळपास १५ लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. कापसाचा पेराही वाढला असून, या पाच जिल्हय़ात कापसाचे क्षेत्र यावर्षी ९ लाख ३७ हजार ४00 हेक्टरपर्यंंत पोहोचले आहे. ३ लाख ४६ हजार ४00 हेक्टरवर तूर पेरणी झाली आहे. यावर्षी मूग पेरणीची वेळ निघून गेली असतानाही या पाच जिल्हय़ात ६४ हजार ३00 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उडिदाची पेरणी घटली असून, ३२,२00 हेक्टर क्षेत्रावर या पिकाचा पेरा शेतकर्‍यांनी केला आहे. ज्वारीची पेरणी ७६,८00 हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे.

** ३0 लाख हेक्टरवरील पिकांनी मान टाकली

२३ जुलै रोजी एक दिवस पाऊस पडला. २४ जुलैपासून मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. तेव्हापासून सार्वत्रिक पाऊस झाला नसल्याने उर्वरित क्षेत्रावरील पेरण्यांची गती मंदावली आहे. या अगोदर पाऊस रिमझिम पडला आणि आता तापमान वाढू लागल्याने पिके कोमेजू लागली आहेत. वाशिम: ३ लाख ९९ हजार ४00 हेक्टर; अमरावती : ६ लाख ४२ हजार ५00 हेक्टर; यवतमाळ: ८ लाख ५१ हजार३00 हेक्टर