Farmers are in trouble, establish government soon | शेतकरी अडचणीत आहे, सरकार लवकर स्थापन करा
शेतकरी अडचणीत आहे, सरकार लवकर स्थापन करा

ठळक मुद्देशरद पवारांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

नागपूर: शेतकरी अडचणीत आहेत, सरकारची स्थापना लवकरात लवकर व्हावी अशी मागणी काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. काटोल तालुक्यातील चारगाव येथील रवींद्र पुनवटकर या शेतकऱ्यांच्या शेतात झालेल्या अतोनात नुकसानीची पाहणी त्यांनी केली. यावेळी अनेक शेतकरी बांधवांनी पवारांसमोर आपापल्या समस्या मांडल्या. अतिवृष्टीमुळे या तालुक्यातील शेतातीतल कापूस, सोयाबीन आदी पिके नष्ट झाली आहेत.

यावेळी शरद पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, आशिष देशमुख व अन्य पदाधिकारी होते.

Web Title: Farmers are in trouble, establish government soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.