शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवराचे संवर्धन करण्यात शासनाला अपयश

By admin | Updated: August 13, 2015 03:34 IST

बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे संवर्धन करण्यात शासनाला अपयश येत असल्याचा आरोप संबंधित याचिकाकर्त्यांनी केला आहे.

हायकोर्टात अर्ज : याचिकाकर्त्याने वेधले विविध समस्यांकडे लक्षनागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे संवर्धन करण्यात शासनाला अपयश येत असल्याचा आरोप संबंधित याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिवाणी अर्ज सादर करून लोणार सरोवराशी संबंधित विविध समस्यांकडे लक्ष वेधले. सुधाकर बुगदाने, कीर्ती निपाणकर व गोविंद खेकाळे यांनी लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या अर्जातील तक्रारी लक्षात घेता शासनाला दोन आठवड्यांत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने आतापर्यंत अनेक निर्णय घेतले असले तरी, त्यावर काटेकोर अंमलबजावणी झालेली नाही. लोणार सरोवराची आजही योग्य देखभाल केली जात नाही. सांडपाणी मिसळणे सुरूच असल्यामुळे सरोवरातील स्वच्छ पाणी घाण झाले आहे. सरोवरातील गोड पाणी नागरिक पिण्यासाठी वापरत होते. आता हे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. यासंदर्भात शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून उपाय शोधणे आवश्यक आहे. पाटबंधारे विभागाने ही जबाबदारी हैदराबाद येथील नॅशनल जिआॅग्राफिकल रिसर्च इन्स्टिट्यूटला दिली होती. या संस्थेने गंभीरतेने कार्य केले नाही. २ मे २०१५ रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चाच झाली नाही असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.बाहेरच्या पाण्यामुळे सरोवरातील पाण्याची पातळी वाढली आहे. परिणामी येथील ‘सासू सुनेची विहीर’ दिसत नाही. लोणार सरोवराच्या उतारावर सर्वत्र काटेरी गवत वाढले आहे. या समस्येवर प्रभावी उपाय करण्यात आलेले नाहीत. सरोवराच्या संवर्धनासाठी शासनाने आवश्यक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या नाहीत. जड वाहनांच्या अवागमनामुळे सरोवर परिसरात भूस्खलनाचे प्रमाण वाढले आहे. सरोवराच्या काठापासून ५०० मीटर अंतरावर कोणतेही बांधकाम करण्यास मनाई आहे. असे असतानाही लोणार नगर परिषदेने २०० मीटर अंतरावर पाणी टाकीचे बांधकाम सुरू केले होते. लोणार पर्यटन विकास समितीने १ जून २००२ रोजी प्रस्ताव पारित करून सरोवराच्या काठापासून ५०० मीटरचा परिसर संरक्षित केला आहे. भारतीय पुरातत्व विभाग सरोवरातील १५ स्मारकांची देखभाल करीत असले तरी स्मारकांच्या जवळ अतिक्रमण व अवैध बांधकाम करण्यात आले आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)