शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू : सोमलवाडा भागात पदयात्रेत संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 11:19 PM

दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातून भाजपकडून रिंगणात उतरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोमवारी सोमलवाडा भागात पदयात्रा काढण्यात आली.

ठळक मुद्देभगिनींनी ओवाळली आरती 

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातून भाजपकडून रिंगणात उतरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोमवारी सोमलवाडा भागात पदयात्रा काढण्यात आली. महापालिकेचे सत्तापक्ष नेते तसेच निवडणूक प्रमुख संदीप जोशी यांच्या नेतृत्वात नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. दरम्यान, स्थानिक भागिनींनी जागोजागी आरती ओवाळून पदयात्रेचे स्वागत केले तसेच मुख्यमंंत्री फडणवीस यांना विजयाचा आशीर्वादही दिला.पदयात्रेत भाजप कार्यकर्त्यांनी ‘मै भी देवेंद्र’ हे घोषवाक्य असलेले टी-शर्ट परिधान केले होते. ज्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सोमलवाडा भागातील सावित्री विहारापासून सोमवारी सकाळी पदयात्रेला सुरुवात झाली. यानंतर संदीप जोशींसह भाजप कार्यकर्त्यांनी राहुलनगर, कांजी हाऊस चौक, कॉस्मोपॉलिटन, झेंडा चौक, आखाडा चौक, बौद्धविहार परिसरातील नागरिकांना भेटी दिल्या. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांना पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी भाजपला मतदान करण्याची जोशी यांनी विनंती केली. घोषणांनी सोमलवाडा परिसरातील वातावरणात भाजपच्या विजयाचा शंख फुंकण्यात आला. फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनविण्यासाठी आपल्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते दिवस-रात्र परिश्रम घेत असल्याचेही जोशी यांनी सांगितले.या पदयात्रेत संदीप जोशी यांच्यासह प्रभागातील नगरसेवक लक्ष्मी यादव, लखन येरवार, वनिता दांडेकर तसेच अनिल सावरकर, भाजपचे ओबीसी महामंत्री चंदू साठवणे, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र मुंडले, प्रभागातील महामंत्री, प्रभाग १६ च्या भाजप झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम