शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात फेसबुकवरचा वाद रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 19:44 IST

फेसबुकवर एकमेकांसोबत संवाद करताना त्याचे वादात रूपांतर झाले. एकाने दुसऱ्याला आईची शिवी दिली. त्यामुळे फेसबुकवरचा वाद रस्त्यावर आला आणि दोघांनी एकावर हल्ला करून त्याला जबर जखमी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फेसबुकवर एकमेकांसोबत संवाद करताना त्याचे वादात रूपांतर झाले. एकाने दुसऱ्याला आईची शिवी दिली. त्यामुळे फेसबुकवरचा वाद रस्त्यावर आला आणि दोघांनी एकावर हल्ला करून त्याला जबर जखमी केले. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. शब्बीर खान आणि आदित्य गेडाम अशी आरोपींची नावे असून, हे दोघेही खरबीच्या साईबाबानगरात राहतात. मनीष हेमराज घरटे हा सुद्धा त्याच वस्तीत राहतो. शब्बीर, आदित्य आणि मनीष हे तिघे एकमेकांचे फेसबुक फ्रेंड होते. मनीष आणि आरोपी शब्बीर तसेच आदित्य फेसबुकवर चॅटिंग करायचे. नाजूक कारणावरून त्यांच्यात वादाला तोंड फुटले.ते एकेरीवर उतरले. मनीषने आरोपी शब्बीर तसेच आदित्यला आईच्या शिव्या दिल्या. त्यामुळे संतापलेल्या शब्बीर आणि आदित्यने मनीषला शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास त्याचा घराजवळ गाठले. तू फेसबुकवर आईच्या शिव्या का दिल्या, अशी विचारणा करून त्यांनी मनीषला हातबुक्कीने मारहाण केली, नंतर लाकडी टोकदार दांड्याने त्याच्या डोक्यावर, डाव्या हातावर जबर मारहाण केली. यामुळे मनीष गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीवरून वाठोडा पोलिसांनी आरोपी शब्बीर खान आणि आदित्य गेडाम या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील चौकशी सुरू आहे.

टॅग्स :FacebookफेसबुकCrime Newsगुन्हेगारी