शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

‘दिवसभर गावात भाऊ करतो हवा, रात्री वहिनी म्हणते भाऊला खरकटे भांडे धुवा...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 13:35 IST

सोशल मीडियावर कोणता ट्रेंड कधी हिट करेल आणि कसा हिट ठरेल हे सांगता येत नाही. सध्या असेच अनेक ट्रेंड फेसबुकवर धुमाकूळ घालतायत.

ठळक मुद्देफेसबुकवर चॅलेंजेसचा धुमाकूळ कुणी टाकतंय जुने फोटो तर कुणी साडीतले‘भाऊ आणि ताई’चा धुमाकूळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोशल मीडियावर कोणता ट्रेंड कधी हिट करेल आणि कसा हिट ठरेल हे सांगता येत नाही. सध्या असेच अनेक ट्रेंड फेसबुकवर धुमाकूळ घालतायत. मित्र-मैत्रिणींच्या जुन्या फोटोंवर ‘भाऊ’ आणि ‘ताई’ या नावाने उखाण्याप्रमाणे यमक जुळवून चारोळ््या कमेंट्स करण्याचा हा ट्रेंड नेटकऱ्यांमध्ये भलताच हिट झाला आहे. कोरोनाच्या विषाणूने सध्या जगभरात थैमान घातले आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी देशातही २१ दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे कुणालाही घराबाहेर पडण्यास मनाई आहे. कुणी बाहेर जाऊ शकत नाही आणि कुणी घरी येउ शकत नाही. त्यामुळे बहुतेकांचा वेळ एकतर टीव्ही किंवा मोबाईलवर घालवावा लागत आहे. मिळालेल्या फावल्या वेळेचा उपयोग इंटरनेटवर अधिक करीत आहेत. सोशल मीडियावरील हा वेळ अधिक मनोरंजक बनविण्यासाठी नेटकऱ्यांकडून नवनवीन शक्कल लढविली जात आहे. अशाच शक्कलीतून ‘भाऊ’ आणि ‘ताई’च्या फोटोंवर चारोळ््या कमेंट्स करण्याचा हा ट्रेंड सध्या भलताच लोकप्रिय झाला आहे. मित्र किंवा मैत्रीणीचे चार-पाच वर्षाआधीचे फोटो फेसबुकवरून उकरून काढायचे आणि त्यावर मजेदार कमेंट करायचे. विशेष म्हणजे येथेही कोरोना आणि लॉकडाउन हेच केंद्रस्थानी आहेत.‘मॅडमचा फोटो पाहून पोर आली धावून, म्हणून सरकारला करावं लागलं २१ दिवस लॉकडाउन’,‘कोरोनामुळे जगात सुरू झाली मंदी, आम्हाला ताईच्या लग्नात खायची आहे बुंदी’,‘आला वारा गेला वारा, मॅडमचा फोटो म्हणजे कोरोनामध्ये संगंधित सॅनिटायझरचा फवारा’,‘पगार मिळाला नाही म्हणून कामगारांनी केला संप, आमच्या मैत्रीणीच्या प्रेमात पडला चक्क डोनाल्ड ट्रम्प’,या ताईवरच्या कमेंट्सनंतर भाऊच्या कमेंटसही धडाकेबाजच म्हणावे लागेल.‘भुवयांच्या खाली डोळे अन डोळ््याखाली नाक, भाऊचा फोटा म्हणजे आ रा रा रा खतरनाक’,‘संगळे शॉप आहेत बंद मिळतो फक्त किराणा, भाऊंचा फोटो म्हणजे पोरींसाठी नजराणा’,‘दिवसभर गावात भाऊ करतो हवा, रात्री वहिनी म्हणते भाऊला खरकटे भांडे धुवा...’असे लई भारी चारोळ््या लोकांच्या मनोरंजनाचा विषय ठरल्या आहेत. फेसबुकवर जुन्या आणि सध्याचा छायाचित्रांमध्ये झालेला बदल बघून, हे नेटकरी शायरीचे कमेंट त्या छायाचित्रांवर लिहिण्यात व्यस्त आहेत. यात केवळ युवकच नव्हे तर पन्नासी गाठलेले ज्येष्ठ नागरिक देखील हा नवीन ट्रेंड पाळत आहेत.याखेरीज साडीतले फोटो टाकण्याचेही चॅलेंज दिले जाते आहे. जुन्या काळातला एक व आताचा एक असेही एक चॅलेंज यावर दिसते आहे. याशिवाय जिमप्रेमींसाठीही अनेक चॅलेंजेस दिली जात आहेत.

टॅग्स :FacebookफेसबुकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस