शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर विश्वास ठेवता येत नाही

By admin | Updated: October 31, 2014 00:51 IST

प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर विश्वास ठेवता येऊ शकत नाही, असा युक्तिवाद आज बचाव पक्षाने अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या बहुचर्चित अक्कू यादव खून

अक्कू यादव खून खटला: बचाव पक्षाचा युक्तिवादनागपूर : प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर विश्वास ठेवता येऊ शकत नाही, असा युक्तिवाद आज बचाव पक्षाने अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या बहुचर्चित अक्कू यादव खून खटल्याच्या सुनावणीदरम्यान केला. बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. आर. के. तिवारी हे आपला युक्तिवाद करताना पुढे म्हणाले की, या खटल्यात चार प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या आहेत. या साक्षीदारांपैकी पोलीस कॉन्स्टेबल दामोदर चौधरी आणि रवींद्र सूर्यवंशी यांनी घटनेच्या दिवशी अक्कू यादव याला न्यायालयात आणले होते. दामोदर हा घटनेच्या वेळी न्यायालयाच्या चॅनल गेटजवळ उभा होता. चॅनल गेटजवळून न्यायालयाच्या आतील काहीही दिसत नसल्याचे त्याने आपल्या साक्षीत कबुल केले आहे. घटनेनंतर पोलीस आले तेव्हा तो सदर पोलीस ठाण्यात गेला होता. परंतु ठाण्यात त्याने तीन तास उशिरा तक्रार नोंदवली आहे. तो घटनास्थळावरील काही आरोपींना ओळखू शकला नाही. घटनेच्या वेळी काही आरोपींनी काही केले हे सिद्ध होत नाही. दुसरा साक्षीदार पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सूर्यवंशी हा अक्कूच्या जवळ होता. अक्कूवर हल्ला होत असताना तो बचाव करीत होता. न्यायालयात रक्त सांडले होते. परंतु सूर्यवंशीच्या कपड्यांवर रक्ताचा एकही डाग नव्हता. हे दोन्ही साक्षीदार घटनास्थळावरून पळून गेल्याने त्यांच्यावर विभागीय कारवाई झालेली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष घटनेच्या वेळी हे दोन्ही साक्षीदार घटनास्थळी नव्हते, हे सिद्ध होते, असेही अ‍ॅड. तिवारी आपल्या युक्तिवादात म्हणाले. अक्कू यादव याचे दोन भाऊ संतोष आणि युवराज यादव यांचे म्हणणे असे होते की, आम्ही घटना तुटलेल्या दरवाजातून पाहत होतो. युवराजने आपल्या उलटतपासणीत तुटलेल्या दरवाजातून आतमधील काही दिसत नव्हते, असे म्हटले आहे. यावरून हे दोन्ही साक्षीदार घटनेच्या वेळी घटनास्थळावर नव्हते हे सिद्ध होते. त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा देऊन निर्दोष सोडून द्यावे, असेही बचाव पक्षाने आपल्या युक्तिवादात म्हटले. बचाव पक्षाचा युक्तिवाद संपला असून १ नोव्हेंबर रोजी सरकार पक्षाचा युक्तिवाद होणार आहे. न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील रवींद्र भोयर आणि बचाव पक्षाचे आणखी एक वकील अ‍ॅड. अशोक भांगडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)