शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
3
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
4
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
5
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
6
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
7
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
8
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
9
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
10
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
11
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
12
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
13
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
14
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
15
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
16
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
17
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
18
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
19
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
20
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर

By admin | Updated: June 14, 2014 02:59 IST

संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या ‘सेव्हन हिल्स बार लाईव्ह मर्डर’ खटल्याची सुनावणी ...

  नागपूर : संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या ‘सेव्हन हिल्स बार लाईव्ह मर्डर’ खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्या न्यायालयात प्रारंभ झाली. या खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बारचा व्यवस्थापक रघुवीर रमेश वल्लभदास हा फितूर झाला. प्रत्यक्ष खून होतानाचे दृश्य सेव्हन हिल्स बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले होते. या दृश्याची सीडी न्यायालयात लॅपटॉपवर रघुवीर याला दाखविण्यात आली असता तो आरोपींना ओळखू शकला नाही. स्वत:ला मात्र त्याने ओळखले. आरोपींच्या संदर्भातील दृश्य अस्पष्ट असल्याचे तो आपली साक्ष देताना म्हणाला. जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे हे हा खटला चालवीत आहेत. त्यांनी रघुवीरची सरतपासणी घेतली. त्याने आपले मूळ बयाण बदलताच त्याला सरकार पक्षाने फितूर घोषित केले. त्यानंतर लागलीच सरकारी वकिलाने त्याची उलटतपासणी घेतली. रघुवीरची मुख्य साक्ष बुधवार ११ जूनपासून प्रारंभ होऊन शुक्रवारी संपली. आता २५ जून रोजी बचाव पक्ष या साक्षीदाराची उलटतपासणी प्रारंभ करणार आहे. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, खटल्यात एकूण सहा आरोपी आहेत. तुषार साहेबराव दलाल रा. दत्तात्रयनगर, कुणाल मोतीराम मस्के रा. गंगाबाई घाट कॉर्पोरेशन कॉलनी, लक्ष्मीकांत ऊर्फ लच्छू रवींद्र फाये रा. भुतिया दरवाजा महाल, अमोल महादेवराव मंदाडे रा. भांडे प्लॉट, भूपेश ऊर्फ रिंकू विठ्ठलराव टिचकुले रा. श्याम पॅलेस काँग्रेसनगर आणि समीर सुरेश काटकर रा. न्यू सोमवारीपेठ क्वॉर्टर, अशी आरोपींची नावे आहेत. त्यापैकी तुषार दलाल हा मुख्य आरोपी आहे. जितू ऊर्फ जितेंद्र मारोतराव गावंडे रा. भगवाननगर अजनी, असे मृताचे नाव होते. खुनाची ही घटना १० जानेवारी २०१३ रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली होती. मृत जितू गावंडे हा प्रॉपर्टी डीलर होता. लच्छू फाये याने जितूकडून तुषारच्या पत्नीच्या बाळंतपणासाठी ५० हजार रुपये उसने घेतले होते. तुषारनेही हे पैसे पाच दिवसात परत करण्याची हमी दिली होती. पाच दिवस लोटूनही त्याने रक्कम परत केली नव्हती. त्यानंतर तो सतत टाळाटाळ करीत होता. जितूच्याही पत्नीचे बाळंतपण असल्याने त्याने तुषारला विनवणी करून पैसे परत करण्यास म्हटले होते. वारंवार फोन करूनही तो पैसे परत करीत नव्हता, उलट धमक्या देत होता. घटनेच्या दिवशी जितू हा आपला भाऊ प्रमोद याच्यासोबत रघुजीनगरातील महाकाळकर इमारतीतील दुय्यम निबंधक कार्यालयात प्रॉपर्टी रजिस्ट्रीच्या कामासाठी गेला होता. या ठिकाणाहून जितूने तुषारला फोन करून जेवढे पैसे असतील तेवढे देऊन टाक, असे म्हटले होते. वस्तुत: तुषारला हे पैसे पचवायचे असल्याने त्याने जितूचा कायमचा ‘गेम’ करण्याची योजना आखली होती. आरोपी तुषारने पैसे घेण्यासाठी जितूला सायंकाळी भांडे प्लॉट येथील सेव्हन हिल्स बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट येथे बोलावले होते. तुषारने जितूला बारच्या बाहेरच गाठून आत नेले होते. बारमध्ये रिंकू टिचकुले हा आधीपासूनच बसलेला होता. त्याच्याजवळ काटेरी चाकू होता. बारच्या काऊंटरजवळ असतानाच तुषारने रिंकूजवळून चाकू घेऊन जितूवर सपासप वार केले होते. त्यानंतर कुणाल मस्के यानेही वार केले होते. लच्छू फाये, अमोल आणि रिंकू हे जितूला घेराव करून होते. बार व्यवस्थापक रघुवीर वल्लभदास याने हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यालाही धमकी दिली होती. जितूच्या देहाची आरोपींनी अक्षरश: चाळण केली होती. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी केला आहे. खटल्यात एकूण ३४ साक्षीदार आहेत. न्यायालयात बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, अ‍ॅड. प्रफुल्ल मोहगावकर, अ‍ॅड. पराग उके आणि अ‍ॅड. उदय डबले काम पाहत आहेत.(प्रतिनिधी)